Nanded BJP Meeting Clash Saam TV
महाराष्ट्र

Nanded News : नांदेडमध्ये भाजपाच्या चिंतन बैठकीत मोठा राडा, मंत्र्यांसमोरच पदाधिकारी एकमेकांना भिडले; पाहा VIDEO

Nanded BJP Meeting Clash : नांदेडमध्ये भाजपची चिंतन बैठक सुरू होण्यापूर्वीच पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच राडा झाला. काही पदाधिकारी एकमेकांना मारण्यासाठी अंगावर धावून गेले.

Satish Daud

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर भाजपकडून चिंतन बैठका घेतल्या जात आहेत. ज्या मतदारसंघात उमेदवाराचा पराभव झाला. तेथील पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजप नेते चिंतन बैठका घेत आहेत. मात्र, या बैठकीत पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये खटके देखील उडत आहेत. असाच काहीसा प्रकार नांदेडमधून समोर आला आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्यांनी त्यांचा पराभव केला. सलग १० वर्ष ताब्यात असलेला मतदारसंघ अचानक हातातून गेल्यामुळे नांदेडमध्ये भाजपकडून चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण पाटील उपस्थित होते. मात्र, चिंतन बैठक सुरू होण्यापूर्वीच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच राडा झाला. पराभवाला एकमेकांना जबाबदार धरून पदाधिकाऱ्यांची बाचाबाची सुरू झाली. वाद इतका विकोपाला गेला, की काही पदाधिकारी एकमेकांना मारण्यासाठी अंगावर धावून गेले.

या संपूर्ण राड्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. चिंतन बैठकीत भाजपचे पदाधिकारीच एकमेकांना भिडल्याने अनेकांकडून या प्रकाराची खिल्ली उडवली जात आहे. दरम्यान, वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. त्यानंतर चिंतन बैठक सुरू झाली. यापूर्वी देखील असा प्रकार घडल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान, गेल्या आठवड्यात सुद्धा स्वतः प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोघांनी माझे काम केले नाही त्यांना शेवटपर्यंत सोडणार नाही, असे म्हणत दम भरला होता. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत भाजपचे दोन पदाधिकारी एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांचा झालेला पराभव हा अंतर्गत गटबाजीमुळे झाल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: प्रसिद्ध इन्फ्लुएंसर अडकली होती वेश्याव्यवसायात; ६ वर्षानंतर अशी झाली सुटका; भयंकर अनुभव सांगताना म्हणाली...

Chhangur Baba : यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन; कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्याची होती तयारी

Sawan 2025 Upay: उत्तरेतील श्रावणाचा आज पहिला दिवस; 'हे' उपाय करा भगवान शंकर होतील प्रसन्न

Maharashtra Live News Update : पंढरपूर पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

Rose : जाणून घ्या गुलाबाचे फूल खाण्याचे ५ फायदे

SCROLL FOR NEXT