Nanded Hingoli accident Saam Tv News
महाराष्ट्र

Nanded-Hingoli Accident : मे महिन्यात विवाह, आई-वडील आनंदात, लेकीला हळद लागण्यापूर्वीच काळाचा घाला; नांदेड दुर्घटनेत माय लेकीचा मृत्यू

Nanded-Hingoli Tractor Accident : हळद लागण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबियांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होतं आहे. धुरपता जाधव आणि सिरमन कांबळे ह्या दोघी एकाच गावातील आणि गरीब कुटुंबातील होत्या.

Prashant Patil

नांदेड : मे महिन्यात लेकीचं लग्न ठरल्याने सर्व जण तयारीला लागले होते. कुटूंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी लेकही आईसोबत मजूरी करण्यासाठी निघाली होती. परंतु, नियतीला कदाचित ते अमान्य होते. मजुरीवर घेऊन जाणारे ट्रॅक्टर ट्रॉली सह विहिरीत कोसळले. यात दोन्हीही मायलेकींचा मृत्यू झाला. तर अन्य एका मुलीचा देखील या घटनेत मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवारी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास नांदेडमधील आलेगाव शिवारात घडली. धुरपता सटवाजी जाधव (वय १८) आणि सिमरन संतोष कांबळे (वय १८) असं दोन्ही मुलींचे नावे आहेत.

हळद लागण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होतं आहे. धुरपता जाधव आणि सिरमन कांबळे ह्या दोघी एकाच गावातील आणि गरीब कुटुंबातील होत्या. महिना भरापूर्वी दोघींची सोयरीक झाली होती. मे महिन्यात त्यांच्या लग्नाची तारीख काढणार होते. लग्नाला पैसे लागणार म्हणून दोन्ही मुली हातभार लावण्यासाठी आई वडिलांसोबत शेत मजुरीला जात होते. २५० रुपये त्यांना मोबदला देखील मिळायचा. लेकीच्या लग्नामुळे कांबळे आणि जाधव कुटुंबीय आनंदीत होतं. मात्र, दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबाच्या आनंदवर विरजण पडलं.

नेमकं काय आहे प्रकरण

शेतात कामासाठी महिला शेतमजूर नेत असताना टॅक्टर विहिरीत कोसळून सात महिला ठार झाल्याची घटना घडली. नांदेड आणि हिंगोलीच्या सीमेवर असलेल्या आलेगाव येथील दगडोजी शिंदे यांच्या शेतात कामासाठी एकूण १० महिला आणि पुरुष शेतमजूर ट्रॅक्टरमधून जात होते. ताराबाई जाधव (वय ३५), धुरपता जाधव (वय १८), सिमरन कांबळे (वय १८), सरस्वती लखन भूरड (वय २५), चऊत्राबाई माधव पारदे (वय ४५), मीना राऊत (वय २५ ) आणि ज्योती सरोदे (वय ३०) अस मयतांची नावे आहेत.

मयत हे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावातील रहिवासी होते. हृदयद्रावक बाब म्हणजे ताराबाई जाधव आणि धुरपता जाधव ह्या दोघी मायलेकी होत्या. चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत पडले. ट्रॅक्टर उलटत असताना उडी मारून ट्रॅक्टर चालक मात्र पसार झाला. विहिरीत पाणी असल्याने पूर्ण ट्रॅक्टर विहिरीत बुडाले. ट्रॅक्टर पडले त्यावेळी आसपास असलेल्या काही शेतकऱ्यांनी पुरभाबाई कांबळे, पार्वतीबाई बुरड आणि सटवाजी जाधव यांना सुखरूप बाहेर काढले. सात महिला ट्रॅक्टर खाली अडकल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर विहिरीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर सातही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होणार; विरोधकांचा वारंवार उच्चार, थेट उत्तर देत एकनाथ शिंदेंनी विषय संपवला

पुण्यात लवकरच 'डबल डेकर ट्विन टनल'; येरवडा ते कात्रजदरम्यान होणार उभारणी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प?

Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवडमध्ये बसचालकाने दोन वाहनांना दिली जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT