Nanded Hadgaon Marriage News Saam Tv
महाराष्ट्र

लग्नासाठी वाट्टेल ते! भरपावसात पुराच्या पाण्यातून नवरदेवाचा जीवघेणा प्रवास

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातून हा प्रकार समोर आला आहे.

संतोष जोशी

नांदेड : उतावळा नवरा आणि गुडग्याला बाशिंग अशी मराठीत म्हण आहे. लग्नासाठी (Marriage) काहीजण वाट्टेल ते करतात. याचाच प्रत्यय नांदेड (Nanded) जिल्ह्यातून आला आहे. लग्नासाठी नवदेवाने चक्क पुराच्या पाण्यातून ७ किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला आहे. नवरदेवाची नदीतून जाणारी ही अनोखी वरात पाहून परिसरातील नागरिकांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातून हा प्रकार समोर आला आहे. (Nanded Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील करोडी गावाच्या शहाजी राकडे नावाच्या तरुणाचा विवाह उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथील गायत्री नामक तरुणीशी ठरला होता. १५ जुलैला दोघांच्याही विवाहाचा मुहुर्त काढण्यात आला होता. तर १४ जुलैला हळदीचा कार्यक्रम होता. मात्र विवाहाची तारीख जवळ असतानाच नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला.

चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणी रस्तेही पाण्याखाली गेले. अशातच हळदीच्या कार्यक्रमाला कसे पोहचायचे असा प्रश्न नवरदेवाकडील नातेवाईकांना पडला. पण नियोजित वेळेत लग्न विधीच्या कार्यक्रमात पोहचण्यासाठी त्यांनी चंग बांधला. (Nanded Hadgaon News)

नवरदेवाकडील वऱ्हाड नवरदेव शहाजी राकडेंसोबत थर्माकॉलच्या तराफ्यावरून पैनगंगा नदीमार्गे ७ किमीचा प्रवास पुरातून हे अंतर पार करत संगम चिंचोली येथे पोहचले. हा सर्व प्रवास जीवघेणार होता. पुराच्या पाण्याचा जर जोर वाढला असता, आणि काही अनुचित प्रकार घडला असता तर काय झाले असते? याची चिंता परिसरातील नागरिकांना होतीच. अखेर वेळेवर नवरदेव सासुरवाडीला पोहचला आणि टिळा आणि हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाला.

विशेष म्हणजे हळदीचा कार्यक्रम यशस्वी पार करुन नवरदेवाचे नातेवाईक पुन्हा नदीतून ओलांडून करोडी गावाला पोहचले. नवरदेव मात्र लग्न असल्याने संगम चिंचोलीला थांबला आहे. उद्या वऱ्हाडी मंडळी संगम चिंचोली जाणार आहेत. आज दुपार नंतर पाऊस थांबल्याने पुर ओसरू लागला आहे. दरम्यान, नवरदेवाने लग्नासाठी चक्क जीव धोक्यात टाकून थर्मोकॉलच्या तराफ्याने प्रवास केल्याने याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT