विष्णुपूरी प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले 
महाराष्ट्र

नांदेड : विष्णुपूरीचे चार दरवाजे उघडले, गोदाकाठच्या गावांना इशारा

प्रशासकीय स्तरावरुन नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आली आहे. पूर नियंत्रण अधिकारी, शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जन यांनी कळविले आहे.

Pralhad Kamble

नांदेड : विष्णुपूरी धरणाच्या वरील बाजूस जोरदार पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा आवक वाढला आहे. त्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पात पाणी साठा वाढला असल्याने पांटबंधारे विभागाने चार दरवाजे उघडले आहेत. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा - मराठवाड्याच्या वाट्याला केवळ इतिहासाचे विविध संदर्भ वाट्याला आले असे नाही तर भौगोलिक दृष्ट्याही हा प्रांत विविध आव्हानांचा साक्षीदार राहिलेला आहे.

धरणाची पाणी पातळी ही ३५४. ९५ मीटर असून सध्या साठा ८०.०२ तर ९९. ०४ टक्के आहे. पाण्याचा विसर्ग-११६८ क्युमेक्स होत आहे.

धरणाचे सहा, सात, १३ आणि १४ गेट उघडण्यात आले आहेत. तरी विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरुन नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आली आहे. पूर नियंत्रण अधिकारी, शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जन यांनी कळविले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उजनी धरणावर उभारणार 2 हजार मेगावॅटचा सोलार प्रकल्प; ४० हजार रोजगारांची संधी

शिंदेसेनेसोबतच्या वादानंतर भाजपचा मोठा निर्णय; 'स्थानिक' निवडणुका स्वबळावर, महिला नेत्याचा कार्यकर्त्यांना संदेश

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये वाहतूककोंडीचा कहर! सकाळी ७ तासांच्या कोंडीनंतर सायंकाळी पुन्हा वाहनांच्या लांबच लांब रांगा

संमतीने ठेवलेले शरीरसंबंध ब्रेकअपनंतर बलात्कार ठरवता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी सरकारचा मोठा प्लान

SCROLL FOR NEXT