पुरात अडकलेल्आ व्यक्तीला तोरणावासियांनी वाचविले
पुरात अडकलेल्आ व्यक्तीला तोरणावासियांनी वाचविले 
महाराष्ट्र

नांदेड- पुरात अडकलेल्या व्यक्तीला वाचवलं; तोरणा येथील गावकऱ्यांच्या धाडसाचं कौतुक

संतोष जोशी

नांदेड : जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातल आहे. सोमवारी (ता. १२) बिलोली तालुक्यातील तोरणा इथं एका ओढ्याला आलेल्या पुरात अडकलेल्या व्यक्तीस गावकऱ्यांनी रेस्क्यू आॅपरेशन राबवत वाचविले. मनिष गिलचे असं पुरात अडकलेल्या व्यक्तीचं नावं आहे.

मनिष गिलचे हा रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा मुनिम आहे. मनिष हा दुचाकीवर सायंकाळी उमरीकडे जात असताना मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आणि रस्त्यावरुन पाणी वाहू लागले. तोरणा गावाजवळ असलेल्या ओढ्याला पुर आला पाण्याचा जोर वाढल्याने मनिष गिलचे दुचाकी सह वाहून जात होते मात्र, मनिष यांनी प्रसंगावधान दाखवत झाडाचा आधार घेत ते झाडावर चढले.

हेही वाचा - नांदेड- विष्णुपूरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले; 60 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

चोहू बाजूने तीन ते चार फुट पाणी साचल्याने गावातील प्रकाश कदम, शिवाजी पुयड, नागनाथ तोकलवाड, विनय शिंदे सह गावकऱ्यांनी रेस्क्यू आॅपरेशन राबवत झाडावरील मनिष यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. गावकऱ्यांनी दाखविलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fungal Infection: वेळीच व्हा सावधान 'या' कारणामुळे होऊ शकतो फंगल इन्फेक्शनचा भयंकर त्रास

Benifits of Chia Seeds: चिया सिड्सचे सेवन महिलांसाठी ठरते अत्यंत फायदेशीर

Dombivali Crime News : पती- पत्नीच्या भांडणात गमावला जीव; डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या घटनामध्ये दोघांची हत्या

Today's Marathi News Live : माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण माघार घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल

Delhi News: कुजलेला तांदूळ, लाकडी भुसा अन् ॲसिडचा वापर.. दिल्लीत १५ टन बनावट मसाले जप्त; ३ अटकेत

SCROLL FOR NEXT