नांदेड : विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा; 20 ते 25 विद्यार्थी जखमी, दुचाकींची तोडफोड! SaamTvNews
महाराष्ट्र

नांदेड : विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा; 20 ते 25 विद्यार्थी जखमी, दुचाकींची तोडफोड!

क्षुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीत अनेक विद्यार्थी जखमी झालेत.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटात मोठा राडा झाला. किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड येथील केंद्र सरकारच्या आदीवासी प्रकल्पाअंतर्गत चालणाऱ्या एकलव्य माॅडेल रेसिडेंशियल स्कूल (Eklavya Model Residential School) मध्ये ही घटना आज सकाळी घडली. क्षुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या मारहाणीत अनेक विद्यार्थी (Students) जखमी झालेत. या हाणामारीच्या घटनेनंतर परिसरातील दुचाकींची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आलीय.

हे देखील पहा :

क्षुल्लक कारणावरुन सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या दोन गटात बाचाबाची झाली त्यानंतर या भांडणाचे पर्यावसान मारहाणीत (Beating) झाले. भांडणे एवढे वाढले की परिसरातील दुचाकींची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. विद्यार्थ्यांनी या मारहाणीत लाठ्याकाठ्यांचा आणि दगड-धोंड्यांचा वापर केला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पोलिसांनी राडा घालणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजारा यांनी भेट देऊन आढावा घेतला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी संधी; भाजपच्या 'या' सर्वात ताकदवर समितीत होणार एन्ट्री?

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

FD Break Rules: FD तोडण्याचा विचार करताय? आधी जाणून घ्या बँक किती पेनल्टी कापते आणि नुकसान कसे टाळाल

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

SCROLL FOR NEXT