Nanded Crime Saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime : नांदेड हादरले..गुंगीचे औषध देत शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

Nanded News : नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथे ही घटना घडली आहे. या घटनेत नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या चारचाकी वाहनातून नेले

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला गड बसवून नेताना पिण्यास पाणी देताना यातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा येथे ही घटना घडली आहे. या घटनेत नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या चारचाकी वाहनातून नेले. या दरम्यान तिला पाण्यातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नाही तर ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी या शिक्षकाने विद्यार्थिनीला दिली. 

विद्यार्थिनी गरोदर राहिल्याने केला गर्भपात 

दरम्यान तुझा बनवलेला व्हिडिओ व्हायरल करेल, असे सांगून शिक्षकाने वारंवार विद्यार्थिनीवर बलात्कार केला. या प्रकारातून पीडित विद्यार्थिनी गरोदर राहिली असता तिचा गर्भपात देखील करण्यात आला. दरम्यान घडलेला प्रकार कुटुंबियांना लक्षात आला. यामुळे मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता पीडित मुलीने घडला प्रकार घरच्यांना सांगितला.  

शिक्षकावर गुन्हा दाखल 

ही माहिती घरच्यांना समजल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चौहान याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आहे. तर आरोपी शिक्षका विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT