Nanded Crime News in Marathi, Nanded Latest Marathi News Saam Tv
महाराष्ट्र

Nanded : जेवणाचं ताट उचलण्यावरून वाद; मुलाने चक्क बापालाच संपवलं

लालू कांबळे असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर प्रकाश कांबळे असं खून करण्याऱ्या मुलाचं नाव आहे.

संतोष जोशी

Nanded Crime News : सुनेनं जेवणाचं ताट उचललं नाही म्हणून बाप आणि मुलामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मुलाने चक्क जन्मदात्या बापाच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेत बापाचा जागीच मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारी ही घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कासराळी गावात घडली आहे. (Nanded News Today)

याप्रकरणी बिलोली पोलिसांनी (Police) आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. लालू कांबळे असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर प्रकाश कांबळे असं खून करण्याऱ्या मुलाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी (३० सप्टेंबर) रात्रीचं जेवण झाल्यानंतर लालू कांबळे यांनी सुनेला ताट का उचलायला सांगितले.

यावेळी सुनेनं ताट उचलले नाही म्हणून लालू कांबळे आणि सुनेतं वाद झाला. त्यावेळी बाजूलाच असलेल्या आरोपी प्रकाशला आपल्या वडिलांचा राग आला आणि त्याने जवळच असलेल्या कुऱ्हाडीने लालू यांच्या अंगावर सपासप वार केले. (Nanded Crime News)

या घटनेत लालू यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी प्रकाश हा फरार झाला होता. पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ताट उचलण्याच्या कारणावरून मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: आजच्या दिवशी लक्ष्मीपुजन करणार असाल तर मुहूर्त जाणून घ्या; वाचा शहरानुसार किती वाजता करावी पुजा?

Lakshmi Puja Upay : लक्ष्मीपूजनात करा सोपे वास्तू उपाय,आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT