Nanded Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nanded Crime : विवाहित महिलेला हॉटेलवर घेऊन गेला; तरुणासोबत घडली भयंकर घटना

अंगावर काटा आणणारी ही घटना मंगळवारी दुपारी लिंगायत स्मशानभूमी जवळ घडली.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विवाहित महिलेला हॉटेलमध्ये का घेऊन गेलास असा जाब विचारत तिच्या नातेवाईकांनी एका विवाहित तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारी ही घटना मंगळवारी दुपारी लिंगायत स्मशानभूमी जवळ घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आठ ते दहा जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

स्वप्निल नागेश्वर असं मृत तरुणाचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, शहरातील (Nanded) देगावचाळ परिसरात राहणाऱ्या स्वप्निल नागेश्वर याने घराजवळील विजातीय असलेल्या एका विवाहित महिलेला हॉटेलवर नेले होते. ही बाब महिलेच्या नातेवाईकांना कळाली. याचा जाब विचारत महिलेच्या नातेवाईकांनी स्वप्नीलला फोन करून लिंगायत स्मशानभूमीजवळ बोलावलं.

तिथे गेल्यानंतर आठ ते दहा जणांनी स्वप्नीलला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण  (Crime News) केली. या मारहाणीत स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर विमानतळ पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. विवाहबाह्य संबंधातून एका विवाहित तरुणाची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT