Nanded Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nanded Crime News : प्रियकराने घातली लग्नाची मागणी; मुलीच्या आईचा नकार दिल्‍याने प्रेयसीला विष पाजून केले ठार

प्रियकराने घातली लग्नाची मागणी; मुलीच्या आईचा नकार दिल्‍याने प्रेयसीला विष पाजून केले ठार

साम टिव्ही ब्युरो

संजय सूर्यवंशी

नांदेड : लग्नाला प्रेयसीच्या आईने नकार दिल्याने युवकाने तरुणीला विष पाजून तिचा खून (Crime News) केला. यानंतर स्वतः विष पिऊन युवकाने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Nanded) नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे ही घटना घडली. (Breaking Marathi News)

भोपाळवाडी (जि. नांदेड) या गावातील २३ वर्षीय तरुणी सुप्रिया जाधव हिचे गावातीलच रोहीदास जाधव (वय २५) तरुणासोबत प्रेमसंबध होते. दरम्‍यान एका रात्री दोघांना मुलीच्या आईने एकत्र पाहिले. परंतु, दोघांची लग्‍नाची तयारी असल्‍याने मुलाने मुलीच्‍या आईकडे लग्नाची मागणी घातली. पण मुलींच्या आईने नकार दिला.

दरम्यान लग्‍नाला नकार दिल्‍याच्‍या रागातून रोहीदास जाधव याने स्प्राईटमधून मुलीला विष पाजले. यानंतर स्वतः देखील विष प्राशन केले. यात मुलीचा मृत्यू झाला तर युवकावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उस्माननगर पोलीसांनी युवकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT