Nanded News Saam tv
महाराष्ट्र

Nanded : हुंड्याचे लाख रुपये न दिल्यामुळे नवविवाहितेची हत्या; नातेवाईकांचा आरोप, चौघांविरोधात गुन्हा

Nanded News : विवाह जुळविताना सासरच्या मंडळींनी हुंड्याची मागणी केली होती. यात एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र लग्न झाल्यानंतर हुंड्याची रक्कम ताऊबाई हिच्या माहेरच्यांकडून दिले गेले नव्हते

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
  : लग्नानंतर काही महिन्यात नवविवाहितेची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दरम्यान हुंड्याची रक्कम न दिल्याने नवविवाहितेची हत्या करण्यात आल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून सासरच्या चौघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जात आहे. 

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील राठोडवाडी गावात सदरची घटना घडली आहे. या घटनेत नवविवाहित ताऊबाई राठोड हिची विष पाजवून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताऊबाई हिचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विवाह जुळविताना सासरच्या मंडळींनी हुंड्याची मागणी केली होती. यात एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र लग्न झाल्यानंतर हुंड्याची रक्कम ताऊबाई हिच्या माहेरच्यांकडून दिले गेले नव्हते. 

चौघांविरोधात हुंडाबळीच्या गुन्हा दाखल 

दरम्यान लग्नाच्या काही महिन्यातच ताऊबाई हिची हत्या करण्यात आली. हुंड्यात ठरलेले एक लाख रुपये न दिल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप मृत तरुणीच्या वडीलांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी सासरच्या चौघांविरुद्ध हत्या आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुखेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

तुळींज पोलीस ठाण्यात दोन गटात फ्रीस्टाइल

नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात अंमलदार कक्षामध्ये दोन गटात फ्री स्टाईल झाल्याचे पाहण्यास मिळाले. यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दोन गटात हि फ्री स्टाईल हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. काही वेळानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही गटाला बाजूला केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT