Nanded News Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Crime: 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रपोज केला अन् जेलमध्ये गेला; नांदेडमध्ये तरुणासोबत नेमकं काय घडलं?

तरुणाईला एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन डेच्या प्रतीक्षेत असतात. मात्र दुसरीकडे एकतर्फी प्रेमातून या दिवशी अनेक भयंकर घटना घडतात.

संतोष जोशी

Nanded Crime News : तरुणाईला एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन डेच्या प्रतीक्षेत असतात. मात्र दुसरीकडे एकतर्फी प्रेमातून या दिवशी अनेक भयंकर घटना घडतात. नांदेडमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे.

मंगळवारी जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. परंतु नांदेडमध्ये व्हॅलेंटाईनडेच्या पुर्वसंध्येला एका तरुणीला 'तुम मेरी गर्लफ्रेंड बनो, म्हणणाऱ्या तरुणाला जेलची हवा खावी लागली आहे. वजिराबाद पोलीस (Police) ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी १३ फेब्रुवारीला वजिराबाद भागात असलेल्या एका महाविद्यालयात अल्पवयीन तरुणी शिक्षण घेत होती. सकाळी ती महाविद्यालयात गेली होती. त्यानंतर दुपारी महाविद्यालयाच्या पायऱ्या उतरत असताना त्याच महाविद्यालयातील एक तरुण तिच्याजवळ आला.

व्हॅलेंटाईन डे आ रहा है, मेरी गर्लफ्रेंड बनो. तुम मुझे बहोत पसंद हो, असे म्हणत या विद्यार्थीनीचा पाठलाग केला. त्यामुळे तरुणी घाबरली आणि तिने थेट 112 क्रमांकाला फोन लावला.

पोलिसांनी तातडीने या तरूणाला महाविद्यालयातून ताब्यात घेतले. आरोपीविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गिरे करीत असल्याची माहिती नि.जगदिश भंडरवार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT