Nanded AMPC Election Result Saam Tv
महाराष्ट्र

Nanded AMPC Election Result: अशोक चव्हाण यांचे बाजार समितीवर वर्चस्व कायम; भाजपचा सुफडा साफ

Ashok Chavan News: नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा राखला आहे.

Shivani Tichkule

संजय सूर्यवंशी

Nanded Latest News: नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा राखला आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण पाच बाजार समित्यांचा निकाल लागला आहे.

शनिवारी जिल्ह्यातील चार बाजार समित्यांचा निकाल घोषित करण्यात आला.तर आज नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागला. या पाच ही बाजार समिती वर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. (Latest Marathi News)

नांदेड (Nanded) बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीला सोबत घेऊन मोट बांधली होती. परंतु भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना (शिंदे गट) यांना सोबत घेऊन चव्हाण यांच्या समोर आव्हान निर्माण केले होते.

बाजार समितीच्या या निवडणुकीच्या प्रचारात भाजपा बाजार समिती मध्ये एन्ट्री करते की काय.अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 18 जागे साठी ही निवडणुक अटीतटीची झाली.दरम्यान 18 पैकी 1 जागा महाविकास आघाडीने बिनविरोध काढली.17 जागे साठी मतदान झाले.आज 17 जागेचे निकाल लागले असून 17 पैकी 16 जागांवर महा विकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. (Nanded News)

एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. 18 पैकी 17 जागेवर विजयी मिळविल्या नंतर महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील बाजार समित्यां आपल्या ताब्यात ठेऊन भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना धूळ चारली आहे.

बाजार समितीचे हे निकाल येणाऱ्या काळात राजकीय दिशा दाखवणारे निकाल आहेत. लोकांचा महाविकास आघाडीवर प्रचंड विश्वास असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या निकालानंतर वेक्त केले.

जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य - प्रताप पाटील चिखलीकर

जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी जो कल दिला आहे ते आम्ही मान्य करतो.परंतु या बाजार समित्यांमध्ये भाजपाने केव्हा नव्हे ते एंट्री केली आहे. भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत.भाजपाचे अनेक उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून भाजपा हा पक्ष जनतेचे कामे करणारा पक्ष आहे .सातत्याने या पुढे देखील आम्ही जनतेचे कामे करू अशी प्रतिक्रिया भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: अमरावतीत युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT