Nanded Crime News Saam TV
महाराष्ट्र

Bribe: सहाय्यक पोलीस निरीक्षकाने ५० हजार रुपयांची मागितली लाच; गुन्हा दाखल

लाच मागितल्या प्रकरणात डेडवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष जोशी

नांदेड : पन्नास हजार रुपयांची लाच (bribe) मागितल्या प्रकरणी नांदेड (nanded) येथे एका सहाय्यक पोलीस निरीक्षका (police officer) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ही कारवाई झाली आहे. (nanded latest marathi news)

शंकर डेडवाल असे लाच मागणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांनी गुटखा प्रकरणातून एकास त्याच्या भावाला आरोपी म्हणून वगळण्यासाठी दोन लाखांची लाच मागितली होती.

तडजोडी अंती 50 हजार देण्याचे ठरले. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर लाच मागितल्या प्रकरणात एसीबीने डेडवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT