Namo 11 Program by Government On Pm Narendra Modi Birthday: Saamtv
महाराष्ट्र

Namo 11 Program: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारची मोठी घोषणा; 'नमो 11' योजनेतून सर्वसामान्यांना काय मिळणार?

डॉ. माधव सावरगावे

PM Narendra Modi Birthday:

देशाचे लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाजपकडून २ ऑक्टोंबरपर्यंत सेवा सप्ताह राबवला जाणार आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारने नमो 11 कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालय पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'आयुष्मान भव' कार्यक्रम सुरू करणार आहे. तर राज्य सरकारकडूनही नमो 11 कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

काय आहे नमो ११ कार्यक्रम...

1) नमो महिला सशक्तिकरण अभियान- 73 हजार महिलांना शासकीय योजनांचा लाभ. चाळीस लाख महिलांना शक्ती गटाच्या प्रवाहात जोडणे, वीस लाख नवीन महिलांची शक्ती गट जोडणी, पाच लाख महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण देणे, पाच लाख महिलांना उद्योग उभारणीसाठी भांडवल उपलब्ध करून देणे, तीन लाख महिला उद्योजकांना बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध करून देणे.

2) नमो कामगार कल्याण अभियान: 73 हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच देणे, भारत उभारणीसाठी योगदान देणाऱ्या हातांचा सन्मान.

3) नमो शेततळे अभियान: 73 हजार शेततळे उभारणे, शेतकऱ्यांची उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी पाण्याची साठवणूक वाढविणे, शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून देणे,मत्स्य व्यवसाय सारखे शेतीस सलग्न व्यवसाय उभारणे.

4) नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियान: 73 आत्मनिर्भर गावे विकसित करणे. शंभर टक्के बेघरांना किंवा कच्च्या घरात राहणार्‍यांना पक्के घर बांधून देणे. शंभर टक्के घरामध्ये शौचालय बांधून त्याचा वापर होण्यासाठी प्रयत्न करणे, शंभर टक्के पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारणे, शंभर टक्के गरजू नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देणे.

100% महिलांची सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे, पाण्याच्या बाबतीत पूर्णपणे स्वावलंबी बनविणे, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे, सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन व सहाय्य,ऑरगॅनिक उत्पादनासाठी विशेष बाजारपेठ, ऑरगॅनिक उत्पादन निर्यातीसाठी मार्गदर्शन, ऑरगॅनिक उत्पादनावर प्रक्रियेसाठी मार्गदर्शन, 73 यशस्वी प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव.

5) नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान: 73 गरीब मागासवर्गीय वस्त्यांचा सर्वांगीण विकास करणे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीब मागासवर्गीयांना पक्की घरे बांधून देणे, 100% पक्के रस्ते उभारणे, शंभर टक्के घरामध्ये वीजपुरवठा करणे, समाज मंदिर उभारणे त्यातून समाज प्रबोधनाचे काम होईल यासाठी प्रयत्न करणे.

6) नमोग्राम सचिवालय अभियान: 73 ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करणे. 73 गावांमध्ये ग्रामसचिवालय उभारणे, सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर होईल यासाठी नियोजन करणे , वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे, संपूर्ण गावचे नियंत्रण कक्ष उभारणे.

7) नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान: 73 आदिवासी स्मार्ट शाळांची उभारणी व सुधारणा करणे व 73 विज्ञान केंद्र उभारणे. आधुनिक संसाधने असणारी शाळा उभारणे, वेगवान इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षण देणे, अंतराळ विषयक मार्गदर्शन, विज्ञानातील महत्त्वाच्या विषयाबाबत मार्गदर्शन, महत्त्वाच्या शोधाबाबत माहिती, ए आय बाबत प्रशिक्षण वर्ग, सायन्स लॅब, टेलिस्कोप व डिजिटलवॉल द्वारे अंतराळ दर्शन.

8) नमो दिव्यांग शक्ती अभियान: 73 दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारणे. अभियान स्वरूपात दिव्यांगांचे सर्वेक्षण व ओळख निश्चित करणे, दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र परिवहन व रेल्वे पास आणि दिव्यांगाना असलेल्या इतर सुविधा उपलब्ध करून देणे, दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे,

दिव्यांगांकरिता राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ देणे, दिव्यांगणा तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे. दिव्यांगांना व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल व कर्ज उपलब्ध करून देणे,दिव्यांगांचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे.

9) नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान: 73 क्रीडा संकुल उभारणे, सुसज्ज क्रीडा मैदान व उद्याने उभारणे, मैदानी क्रीडा सुविधा देणे ,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण सुविधा देणे, खेळाडू समुपदेशन व सक्षमीकरण करणे.

10 नमो शहर सौंदर्य करण अभियान: 73 ठिकाणी शहर सौंदर्यकरण प्रकल्प राबविणे. शहरातील जीवनमान उंचावण्यासाठी बगीचे, तलाव, रस्ते, पद दुभाजक, चौक अशा सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्यकरण करणे. लोकसहभागाच्या माध्यमातून सौंदर्यकरण टिकून राहावे यासाठी प्रयत्न करणे.

11) नमो तीर्थस्थळे व गड किल्ले संरक्षण कार्यक्रम: 73 पवित्र ऐतिहासिक, धार्मिक स्थळांची सुधारणा करणे. ऐतिहासिक व पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार, प्राथमिक सुविधा उपलब्ध, डिजिटल दर्शन, परिसर सुशोभीकरण, स्वच्छता. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: बळीराजासाठी केंद्राची खास योजना! मिळतात ६ हजार रुपये; जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT