Nalasopara News Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Nalasopara News: उघड्या डीपी बॉक्समध्ये विजेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

उघड्या डीपी बॉक्समध्ये विजेचा धक्का लागून इसमाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

चेतन इंगळे

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर भागात उघड्या डीपी बॉक्समध्ये विजेचा धक्का (Electric Shock) लागून इसमाचा मृत्‍यू झाला. सदर घटनेत इसमाचा (Nalasopara) जागीच मृत्यू झाला. घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Breaking Marathi News)

नालासोपारा परिसरातील रहिवासी असलेला इसम रस्त्याने जात होता. यावेळी पाऊस पडला असल्‍याने रस्‍त्‍याने चालत असताना तो रस्त्यावर घसरला. यामुळे बिल्डिंगमधील लावलेल्‍या इलेक्ट्रिक बॉक्समध्ये अडकला. या पेटीत असलेल्‍या डीपीच्‍या फ्युजमधील इलेक्‍ट्रीक शाॅक लागला. यात सदर इसमाचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अनेक पेट्या उघड्या

वसई विरार नालासोपारा (CCTV) येथे अनेक डीपी बॉक्स उघडे आहेत. परंतु, एमएसइबीचे कर्मचारी लक्ष देत नाहीत. अशा परिस्थितीत अशी घटना घडणे शक्य आहे. आता या प्रकरणी महावितरण काय करते, हे पाहण्याचा विषय ठरणार आहे. सध्या तुळींज पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आता ही महावितरणची बेफिकिरी की सोसायटी हे पोलीस तपासात उघड होईल. पुढील तपास तुळींज पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

SCROLL FOR NEXT