Nalasopara News Saam tv
महाराष्ट्र

Bus Fire : नालासोपाऱ्यात पालिकेच्या परिवहन बसला पुन्हा आग; मोठी दुर्घटना टळली

Nalasopara News : नालासोपारा पूर्वेकडील सनशाइन येथे महापालिकेने भंगार झालेल्या परिवहन सेवेच्या बस ठेवण्यात आल्या आहेत.

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेच्या भागात पालिकेच्या परिवहन सेवेच्या भंगार बसला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पुन्हा एकदा भंगार बसने अचानक पेट घेतला आहे. यापूर्वी रविवारी रात्री देखील आग लागून सहा बस जळल्या होत्या. 

नालासोपारा (Nalasopara News) पूर्वेकडील सनशाइन येथे महापालिकेने भंगार झालेल्या परिवहन सेवेच्या बस ठेवण्यात आल्या आहेत. या बस अजूनही हटविण्यात न आल्याने सातत्याने यांना आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. यातच बुधवारी पुन्हा एकदा अचानकपणे येथील एका बसला आग लागल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती नागरिकांनी तात्काळ महापालिकेच्या (Fire Brigade) अग्निशमन दलाला दिली. 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसून भंगार बस जळून खाक झाली आहे. अशा प्रकारामुळे येथून प्रवास करण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. 

भंगार बस पडून असल्याने धूम्रपान करण्यासाठी चरसी व गर्दुल्ले यांचा वावर वाढला आहे. या ठिकाणी आगी लागत असून त्या लावल्या जात असल्याचा आरोप भाजपचे अल्पसंख्याक जिल्हा प्रभारी मुज्जफर घनसार यांनी केला आहे. तर बस हटवा अन्यथा नवनिर्वाचित आमदार यांना सोबत घेऊन पालिकेच्या समोर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold-Silver Rate : २४ तासांत मार्केट जाम! सोनं ४,५०० रुपये, चांदी १३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Maharashtra News Live Update: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक; मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित

Paneer Koliwada Recipe : रोजच्या वरण भाताला कंटाळलात? मस्त चटपटीत पनीर कोळीवाडा रेसिपी बनवा फक्त १५ मिनिटांत

Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

रक्तातील साखर वाढणार नाही! फक्त या 3 भाज्या खा

SCROLL FOR NEXT