Nalasopara Crime Saam tv
महाराष्ट्र

Nalasopara Crime : प्रेमासाठी वाट्टेल ते..! प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी युवकाने चोरल्या सात रिक्षा, स्कुटर

Nalasopara News : तिच्यावर छाप पाडण्यासाठी तिचे खर्च भागवण्यासाठी शशिकांतने अनोखा मार्ग अवलंबला. रिक्षा चोरून तो रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करायचा. पोलिसांनी छडा लावत शशिकांतला ताब्यात घेतले

Rajesh Sonwane

मनोज तांबे
नालासोपारा
: प्रेमात आकांत बुडालेल्या युवकाने आपल्या प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दर्शविली. प्रेयसीला चांगले गिफ्ट देण्यासाठी तसेच ती काही मागत असेल तर तिचा हट्ट पुरविण्यासाठी युवकाने हद्दच पार केली. शहरात फिरताना तब्बल सात रिक्षा, एक स्कूटर आणि एक मोबाईल चोरी केल्याचे समोर आले आहे. चोरी करणाऱ्या या युवकाला आचोळे पोलिसांनी अटक केली आहे.

आचोळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शशिकांत कामनोर (वय २४) असे या तरुणाचे नाव आहे. तो मुंबई व उपनगरातील विविध भागांतून वाहनांची चोरी करत होता. शशिकांत हा मूळचा मालाडचा असून त्याची प्रेयसी नालासोपारा आचोळे परिसरात राहत होती. तिच्यावर छाप पाडण्यासाठी आणि तिचे खर्च भागवण्यासाठी शशिकांतने अनोखा मार्ग अवलंबला होता. पोलिसांनी विविध तक्रारींचा छडा लावत शशिकांतला ताब्यात घेतले आहे. 

रिक्षा चोरी करून करायचा प्रवासी वाहतूक 

मुंबईतील रिक्षा चोरून तो त्या रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करायचा. रिक्षा चालवून मिळणाऱ्या पैशातून तो गर्लफ्रेंडचे हट्ट पुरवायचा. मात्र, रिक्षाचे पेट्रोल किंवा सीएनजी संपल्यावर तो त्या रिक्षा तिथेच सोडून द्यायचा. त्याने मुख्यतः आचोळे, विरार, देवनार, अंधेरी, बांद्रा आणि एमएचबी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी केल्या होत्या. यातील आचोळे पोलीस ठाणे २, विरार १, देवनार १, अंधेरी १, बांद्रा २ आणि एमएचबी १ अशा एकूण ८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सर्व वाहने व मोबाईल केला जप्त 
चोरीच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता शशिकांत यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान शशिकांतच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सर्व चोरी केलेली वाहने आणि मोबाईल हस्तगत केला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास आचोळे पोलीस करत असून त्याच्याकडून आणखी काही चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT