Crime News Saam tv
महाराष्ट्र

Naigaon Crime : एटीएम फोडून ४ लाख ३० हजारांची रोकड लंपास; नायगावमधील घटना

Naigaon News : वस्तीचा परिसर असताना देखील बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले. यानंतर यातील सर्व चार लाख २९ हजार ७०० इतकी रोकड काढून पसार झाले

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे

नायगाव : वसई- विरारच्या नायगाव पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत असलेल्या ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी फोडले आहे. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली असून सकाळी हा प्रकार समोर आला. यात चोरट्यांनी एटीएममध्ये असलेली तब्बल ४ लाख ३० हजारांची रोकड लंपास केली आहे.

वसई- विरारच्या नायगाव (Naigaon) पूर्वेच्या टीवरी राजावळी रस्त्यालगत नवकार फेज थ्री इमारत आहे. या इमारतीत ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. वस्तीचा परिसर असताना देखील बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडले. यानंतर यातील सर्व चार लाख २९ हजार ७०० इतकी रोकड काढून पसार झाले. एटीएम (ATM) फोडल्याचा हा प्रकार सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.  

यानंतर नायगाव पोलिसांनी (Police) घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. एटीएम फोडताना त्या ठिकाणी दोन व्यक्ती असल्याचे समजले आहे. मात्र आणखीन त्याचे साथीदार सोबत असण्याची शक्यता आहे. त्याचा ही तपास सुरू असल्याची माहिती नायगाव पोलिसांनी दिली आहे. दरम्यान यापूर्वी सुद्धा वसई विरार मध्ये एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT