Nahik Ramkund News: नाशिकमध्ये लोकांच्या भावानांशी खेळले जात असल्याची घटना समोर आली आहे. येथील रामकुंडावर मृत व्यक्तींच्या अस्थींची हेळसांड होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विसर्जनानंतरही अस्थी गोदावरी नदीपात्रात पडूनच असल्याची बातमी साम टीव्हीने दिली होती. या बातमीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नदीपात्रात पाणी सोडले. त्यामुळे अस्थींचा ढिग पुन्हा पाण्याखाली गेला आहे.
नाशिकमधील रामकुंडात अस्थी विसर्जन करणे हा देशभरातील भाविकांच्या आस्थेचा विषय आहे. रामकुंडावर अस्थी विसर्जनाला देशभातील लोकांच्या भावनेच्या दृष्टीने मोठं महत्त्व आहे. रामकुंडावर अस्थी विसर्जन केल्याने अस्थी विरघळतात असे मानले जाते.
पुरानात आणि ब्रिटिशांच्या गॅझेटिअरमध्ये देखील याचा उल्लेख आहे. वैज्ञानिक दृष्ट्या देखील हे सिद्ध झाले आहे. मात्र नदीपात्रात काँक्रीटीकरण केल्यानं नदीपात्रातील नैसर्गिक झरे बंद झाले आणि त्याचा परिणाम या अस्थींवर होत आहे. यामुळे देशभरातील भाविकांच्या आस्थेशी येथील स्थानिक प्रशासन खेळ करत असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)
नाशिकमधील रामकुंडात अस्थीविसर्जनाला खूप महत्त्व आहे. देशातील अनेक मोठे नेते आणि सेलिब्रिटींच्या अस्थी देखील रामकुंडात विसर्जित करण्यात आल्या आहेत. रामकुंडाच्या स्वच्छतेसाठी नदीपात्रातील पाणी कमी केल्याने हा अस्थींचा ढिग समोर आला होता. साम टीव्हीने याबाबात बातमी दाखवताच प्रशासनाने त्याची दखल घेऊन नदीपात्रात पाणी सोडले. त्यामुळे अस्थी पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.