नागपूर दंगल पोलिसांवर हल्ला Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: 'पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून काढू', नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकांना इशारा

Devendra Fadnavis Vows Strict Action Against Attackers: 'नागपूर हिंसाचारावेळी ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय. त्यांना कबरीतून खोदून काढू', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले.

Bhagyashree Kamble

नागपुरातील हिंसाचारानंतर मास्टरमाईंड फहीम शमीम खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. २ गटात झालेल्या राड्यानंतर २०-२५ पोलीस जखमी झाले होते. पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत रोष व्यक्त केला आहे.

'नागपूर हिंसाचारावेळी ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय. त्यांना कबरीतून खोदून काढू. त्यांना सोडणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण पोलिसांवर हल्ला हा क्षम्य नाही, आम्ही कठोर कारवाई करू, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे.

नागपुरात उसळलेली दंगल ही पूर्वनियोजित होती का? यासंदर्भात चौकशी सुरू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकटकांवर रोष व्यक्त केला आहे. 'नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. त्यांना कबरीतून खोदून काढू. त्यांना सोडणार नाही', असं फडणवीस म्हणाले आहेत.

'बाकी सगळ्या गोष्टीत क्षम्य आहेत. पण पोलिसांवर हल्ला हा क्षम्य नाही. त्यामुळे ज्यांनी कुणी पोलिसांवर हल्ला केला आहे. त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करू. ही कारवाई करून त्यांच्यावर चौकशीही केली जाईल', असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

कडक कारवाई होणार

'नागपूर आता शांत आहे. नागपूर शहर शांततेसाठीच प्रसिद्ध आहे. १९९२ नंतर नागपुरात एकही दंगल झाली नाही. १७ मार्चला घडलेल्या घटनेत काही लोकांनी जाणीपूर्वक या गोष्टी केल्या असं दिसून येत आहे. जे लोक सामाजिक स्वास्थ बिघडवतात. जाणीवपूर्वक अफवा पसरवतात. त्यांनाही दोषी ठरवण्यात येईल.

या गोष्टीवर कारवाई झालेली आहे. काही समाजकंटकांना पकडलेलं आहे. या प्रकरणात अतिशय कडक कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही', असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाना भानगिरे यांनी लुटला प्रचारादरम्यान क्रिकेट खेळण्याचा आनंद

Red Chilli Thecha Recipe: महिनाभर टिकेल असा लाल मिरच्यांचा झणझणीत ठेचा कसा बनवायचा? वाचा रेसिपी अन् काही टिप्स

Women Investment Tips: कमी गुंतवणूक अन् जास्त फायदा, महिलांसाठी पैसे गुंतवणूकीच्या या 5 बेस्ट स्कीम

Viral Video : बेफाम दारू प्यायला अन् बार गर्लवर पैसे उधळले; नवी मुंबईतील पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : राजकीय दबावामुळे अधिकार्‍यांचे राजीनामे, अजित पवार स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT