Nagpur Crime Saam Tv News
महाराष्ट्र

Nagpur Crime: कामावरून काढल्याचा राग अनावर, दुचाकी पेटवली आणि जीव दिला, नागपूर हादरलं

Employee job termination killed himself: मद्यपान करणाऱ्या कर्मचार्‍याला कामावरून काढले म्हणून डोजर चालकाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना नागपुरातील खापरखेडा गावात घडली आहे.

Bhagyashree Kamble

मद्यपान करणाऱ्या कर्मचार्‍याला कामावरून काढले म्हणून डोजर चालकाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. कामावरून काढून टाकल्यामुळे कर्मचार्‍याने आधी रागाच्या भरात दुचाकी पेटवली. नंतर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे घडली आहे.

कामावर सतत मद्यपान करून येतो म्हणून सुपरवायझर डोजर मालकाने व्यसनी चालकाला कामावरून काढले होते. ललित वस्त्राने असं डोजर चालकाचे नाव आहे. ललित हा विद्युत केंद्रात डोजर चालक म्हणून कार्यरत होता. ललितला दारूचे प्रचंड व्यसन होते.

ललित नेहमी कामावर दारू पिऊन जायचा. कधी कधी कामाच्या ठिकाणीही तो मद्यपान करायचा. अनेकदा सुपरवायझर तसेच डोजर मालकाने त्याला दारू पिऊन येऊ नकोस असे ठणकावून सांगितले होते. मात्र ललित वस्त्राने याच्या वागणुकीत कुठलीही सुधारणा झालेली नाही.

वारंवार मद्यपान करून येणार्‍या ललितला सुपरवायझर तसेच डोजर मालकाकडून चेतावणी देण्यात आली होती. मात्र तरीही ललित कायम मद्यपान करून येत होता. याच कारणावरून सुपरवायझर तसेच डोजर मालकाने ललितला कामावरून काढण्याचे ठरवले.

सुपरवायझर तसेच डोजर मालकाने ललितला कामावरून काढले. कामावरून काढल्यानंतर ललितला राग अनावर झाला. खापरखेडा परिसरातील निर्जन स्थळी जात ललितने आधी दुचाकी पेटवून घेतली, नंतर स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT