Nagpur Traffic Police News Update SAAM TV
महाराष्ट्र

No Parking : कमाल आहे...बाईकसकट चालकालाही क्रेननं उचललं (व्हिडिओ पाहा)

या घटनेची चर्चा समाज माध्यमात देखील रंगली हाेती.

संजय डाफ

नागपूर : नो पार्किंगमध्ये दुचाकी लावल्याने नागपूर (nagpur) शहरातील (city) वाहतूक शाखेच्या हायड्रॉलिक क्रेननं चक्क दुचाकीस्वारासह उचलले. दरम्यान या घटनेची वाहतुक उपायुक्तांपर्यंत पाेहचल्यानंतर त्यांनी नाे पार्किंगमधील वाहनं उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या क्रेनच्या ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिले आहेत. (Nagpur Latest Marathi News)

नागपूर शहरातील अंजुमन कॉम्प्लेक्सच्या बाहेर एक दुचाकी लावण्यात आली हाेती. ही दुचाकी नो पार्किंग क्षेत्रात लावण्यात आली लावली होती. वाहतूक (traffic) विभागाने नो पार्किंगमध्ये वाहन असलेले वाहन उचलण्याचं कंत्राट एका खाजगी कंपनीला दिलं आहे.

या कंपनीच्या कर्मचा-यांनी अंजुमन कॉम्प्लेक्सच्या बाहेर नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी उचलताना संबंधित दुचाकीचा मालक त्याठिकाणी आला व दुचाकीवर बसला. संबंधित कर्मचा-यांनी हायड्रोलिक क्रेनच्या साह्याने चक्क चालकासह दुचाकी उचलली. त्यामुळे संबंधित दुचाकी चालक काही काळात हवेत तरंगत हाेता. या घटनेची माहिती वाहतूक उपायुक्तांपर्यंत गेली. त्यानंतर वाहतुक उपायुक्तांनी संबंधित ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - भुसावळमध्ये मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ; पोलिसांची रात्री वाहन तपासणी

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT