राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण  मंगेश मोहिते
महाराष्ट्र

राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. नागपूरच्या अंबाझरी तलाव परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मदत व आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे (SDRF) आज आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. नागपूरच्या अंबाझरी तलाव परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मदत व आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी आर विमला व एसडीआरएफ चे अधिकारी उपस्थित होते. 

हे देखील पहा -

एनडीआरएफ (NDRF) च्या धर्तीवर राज्यात एसडीआरएफ ची २०१६ साली स्थापना करण्यात आली. पूर, चक्रीवादळ, भूस्खलन, यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना सुरक्षित स्थळाहून बाहेर काढून त्यांचे जीव वाचवण्याचे महत्वपूर्ण कार्य एसडीआरएफ च्या पथकांकडून करण्यात येते.

नुकतेच कोंकण व पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूर परिस्थितीत याच एसडीआरएफ च्या चमूने उत्कृष्ट कामगिरी करत नागरिकांची मोठ्या प्रमाणात मदत केली. या एसडीआरएफ पथकाचे एक केंद्र नागपूर आहे. नागपूरच्या या चमूकडून नागपूरच्या अंबाझरी तलावात रविवारी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

या प्रात्यक्षिकांमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचवणे, त्यांना सुरक्षित स्थळी हलवणे, आरोग्य सेवेसह तातडीची मदत उपलब्ध करून देणे यासारख्या प्रात्यक्षिकांचा समावेश होता. सोबतच पूर परिस्थितीत घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून सामान्य नागरिक त्यांचा जीव कसा वाचवू शकतात याचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

दुर्दैवी! वासरासाठी गोठ्यात धावत गेली अन् घात झाला, मायलेकाचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात हळहळ

प्रसिद्ध गायिका राजकीय रिंगणात उतरणार? भाजपच्या विनोद तावडेंची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

Konkan Tourism : 'हा सागरी किनारा'; कोकणात गेल्यावर 'या' बीचवर मारा फेरफटका

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

SCROLL FOR NEXT