NagpurRenaming saam tv
महाराष्ट्र

नागपूरचं नाव दीक्षाभूमी करा, संजय राऊतांची मागणी; काँग्रेसचा पाठिंबा, भाजपची सावध भूमिका

Rename Nagpur as Dikshabhoomi: दादरनंतर आता नागपूरच्या नामांतरावरून राजकीय कुस्ती रंगलीय...नागपूरचं नाव दीक्षाभूमी करा, अशी मागणी नेमकी कुणी केलीय? सत्ताधाऱ्यांनी या मागणीवर काय भूमिका घेतलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा गैरसमजातून निर्माण झालेला वाद शमतो ना शमतो तोच आता नागपूरच्या नामांतरावरून नवं राजकारण तापलंय. दादरपेक्षा नागपूरचं नाव 'दीक्षाभूमी' करा, अशी मागणी ठाकरेसेनेच्या खासदार संजय राऊत यांनी केलीय. उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर राऊतांनी ही मागणी केल्याचं सांगत सरकारनं तसा प्रस्ताव आणावा, असं त्यांनी नमूद केलंय. काँग्रेसनं राऊतांच्या या मागणीला लगेचच पाठिंबा दर्शवलाय.

राऊतांच्या या मागणीनंतर भाजपनं सावध भूमिका घेतलीय. नागपूर हे दीक्षाभूमीमुळेच ओळखलं जात असल्याचा युक्तिवाद महसूलमंत्री बावनकुळेंनी केलाय.

दादर मेट्रो स्टेशन ऐवजी दादर रेल्वे स्टेशनचं नामांतर होणार असल्याची चुकीची माहिती प्रशासनानं दिल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि घाईगडबडीत या निर्णयाला मनसेनं विरोध केला होता. आता ठाकरेसेनेच्या राऊतांनी थेट नागपूरच्या नामांतराचा मुद्दा पुढे आणल्यानं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि ऐतिहासिक वारशाचा दाखला देत सर्वच पक्ष आपापली भूमिका मांडतायत... मात्र यानिमित्तानं राज्यात पुन्हा नामांतराचा वाद पेटण्याची शक्यता आहे. शहरं, ठिकाणं आणि रस्त्यांना महापुरूषांची नावं देण्यापेक्षा त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात रेखा कोंडे यांना मारहाण

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका! चार अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या, कोणाची कुठे झाली बदली?

'या' महिन्यात होणार मोठा राजकीय भूकंप? शिवसेना कुणाची, खासदाराने थेट तारीखच सांगितली

Saturday Horoscope: या 5 राशींच्या नशिबात धनलाभाचे योग, कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा शनिवारचे राशीभविष्य

जमीन व्यवहारांवर आता आयकर विभागाची नजर! 2 लाखांवरील व्यवहारांची माहिती थेट सरकारला जाणार

SCROLL FOR NEXT