Nagpur Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime: मानसोपचार तज्ज्ञाचा प्रताप! उपचाराच्या नावाखाली अनेक तरुणींवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओद्वारे ब्लॅकमेलिंग

Nagpur Police: नागपुरात मनोसउपचार तज्ज्ञाने उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलींसह महिलांचा लैंगिक छळ केल्याची घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये मानसोपचार तज्ज्ञाने अल्पवयीन मुलीसह महिलांचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात मानसोपचार तज्ज्ञाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात मनोसउपचार तज्ज्ञाने अल्पवयीन तरुणीसह महिलांचा लैंगिक छळ केल्याची घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. लैंगिक छळादरम्यान फोटो काढून मानसोपचार तज्ज्ञ तरुणी आणि महिलांना ब्लॅकमेल करत होता. एका तरुणीने हिम्मत करत पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत हुडकेश्वर पोलिसांनी मानसोपचार तज्ज्ञाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात नोव्हेंबरमध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान आणखी दोघींनी ४ जानेवारीला हिम्मत दाखवत तक्रार दाखल केली. मानसोपचार तज्ज्ञ नैराशाच्या गर्तेत असलेल्या महिला आणि मुलींसाठी शिबीर घेत होता.

नैराश्येत असलेल्या महिलांसाठी शिबिराचे आयोजन करत मानसोपचार तज्ज्ञ त्यांना घेऊन बाहेरगावी जात होता. त्याठिकाणी तो या पीडितांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर लैगिंक अत्याचार करत होता. या अत्याचाराचे फोटो आणि व्हिडीओ काढून घेत नंतर त्याच्याच माध्यमातून तो या मुली आणि महिलांना ब्लॅकमेल करत होता ही धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली. आरोपीने आणखी किती महिलांवर लैंगिक अत्याचार केले याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Juices For Glowing Skin: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कोणते ज्यूस प्यावे?

Maharashtra Live News Update: पुण्यात भैरोबा नाला येथील दोन घरांना आग,सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Dahi Bhindi Recipe : ऑफिसमधून आल्यावर फक्त १० मिनिटांत बनवा दही भेंडी, रेस्टॉरंटसारखी चव येईल घरच्या जेवणाला

सर्वात मोठी बातमी! 42 आमदारांवर कारवाई होणार? उच्च न्यायालयानं बजावली नोटीस, राजकीय वर्तुळात खळबळ

Baby Teeth Cleaning Tips: बाळाचे दात घासायला कधी सुरू करावे?

SCROLL FOR NEXT