Nagpur Police Raid Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Police Raid: रिसॉर्टवर सुरू होता धक्कादायक प्रकार; अचानक पोलीस धडकले, ६ तरुणींसह १२ पुरुष सापडले (Video)

नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला जवळ टायगर पॅराडाईज रिसॅार्टवर पोलिसांनी छापा टाकला आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News Today: नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हांडला जवळ टायगर पॅराडाईज रिसॅार्टवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या रिसॅार्टवर झिंगाट पार्टी आणि अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकत ६ डान्सर मुलींसह १२ पुरुषांवर कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान विदेशी दारूसह रोकड देखील जप्त करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

अधिक माहिती अशी की, नागपूरमधील उमरेड कऱ्हांडला परिसरात असलेल्या पॅराडाईज नावाच्या रिसॉर्टमध्ये झिंगाट पार्टी सुरू होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी (Police) त्या ठिकाणी छापा टाकला.

पोलिसांनाही रिसॉर्टमधील दृष्य पाहून धक्का बसला. या रिसॉर्टवर दारू पार्टी आणि अश्लील नृत्य सुरू होते. या प्रकरणात पोलिसांनी ६ डान्सर मुली आणि १२ पुरुषांवर कारवाई केली आहे. या कारवाईत नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही डॉक्टर आणि बड्या व्यापाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. (Nagpur News)

या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आणि रोकड देखील देखील जप्त केली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT