Nagpur Police Constable Shilratna Belekar Sucide Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : पोलिसाची तलावात उडी मारून आत्महत्या, नागपूर पोलिस दलात खळबळ; धक्कादायक कारण समोर

Nagpur Police Constable Shilratna Belekar Sucide Crime News : नागपूरमध्ये कौटुंबिक वादातून नैराश्यात गेलेल्या पोलीस हवालदाराने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेपत्ता तक्रारीनंतर मृतदेह तलावात आढळला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • कौटुंबिक वादातून नैराश्य; पोलीस हवालदाराने तलावात उडी घेतली

  • दोन दिवस बेपत्ता असल्यानंतर मृतदेह आढळला

  • ओळखपत्रावरून मृताची ओळख पटली

  • घटनेमुळे कुटुंबीय व पोलीस दलात हळहळ

Nagpur Police Constable Shilratna Belekar Sucide In Ambazari Lake नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने सोमवारी रात्री अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. पत्नी सोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून नैराश्यात आलेल्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिलरत्न भीमराव बेलेकर( वय ४५) असे मृत हवलदार यांचे नाव आहे. अलीकडेच काही महिन्यांपूर्वीच हिंगणा पोलीस ठाण्यातून त्यांची बदली होऊन प्रतापनगर पोलीस ठाण्यात झाली होती. शिलरत्न यांचा पत्नीशी गेल्या दोन वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे ते दोन्ही मुलांसह इसासनी भागातल्या वडिलोपार्जित घरी रहात होते. त्यांचा एक मुलगा आठवीत तर दुसरी मुलगी चौथीच्या वर्गात शिकते.

गेल्या काही दिवसांपासून पत्नी मुलांचा ताबा मागत असल्याने शिलरत्न नैराश्यात आले होते. १९ फेब्रुवारीपासून ते पोलीस ठाण्यात गैरहजर होते. ते घरी देखील आले नव्हते त्यांच्या भावाने २२ फेब्रुवारीला शिलरत्न बेपत्ता झाल्याची तक्रार प्रतापनगर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान मंगळवारी सकाळी अंबाझरी तलावात पोहत असलेल्या काही तरुणांना एक मृतदेह दिसला. त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह तलावाबाहेर काढून तपासणी केली असता त्यात शिलरत्नचे ओळखपत्र सापडले. अंबाझरी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला रवाना केला. दरम्यान शिलरत्न यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांची मुलं वडिलांच्या मायेला पोरकी झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT