Nagpur News Saam Tv News
महाराष्ट्र

Nagpur News: RBI समोर शेंगदाणे विकणाराच सुत्रधार, नागपुरात २ हजारांच्या नोटा बदलून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Nagpur 2000 Rupee Note Racket: भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर चलनातून बाद केलेल्या २ हजार रूपयांच्या नोटा बदलवून देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी ४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Bhagyashree Kamble

नागपूर: आधी ५०० मग १००० नंतर २००० हजारांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. मागील दीड वर्षांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेनं २ हजार रूपयांची नोट चलनातून बाद केल्या होत्या. २ हजार रूपयांवर बंदी घालण्यापूर्वी, रिझर्व्ह बँकेनं नोटा बदलून घेण्याचं आवाहन केलं होतं. अनेकांनी त्या नोटा बदलून घेतल्या होत्या. मात्र अजूनही काही ठिकाणी २ हजार नोटा बदलवून मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, ४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं चलनातून बाद केलेल्या २ हजार रूपयांच्या नोटा बदलवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत, रॅकेटचा पर्दाफाश केला असून, पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तसंच या रॅकेटमध्ये मोठी व्यापाऱ्यांची टोळी असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी मिळाली होती.

या रॅकेटमध्ये चलनातून बाद केलेल्या २ हजार रूपयांची नोट बदलवून देण्यात येत होती. मजुरांच्या माध्यमातून बाद केलेल्या २ हजार रूपयांच्या नोटा बदलण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांशी रॅकेटचं कनेक्शन होतं. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. मजुरांना काही रूपयांचं आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रूपयांच्या नोटा बदलवून घेण्याचं काम सुरू होतं.

यामागं व्यापाऱ्यांची मोठी टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, नागपूर पोलिसांनी कारवाई केली. याच माहितीच्या आधारावर दलाल नंदलाल मोर्या, व्यापारी अनिलकुमार जैन आणि किशोर बोहरिया यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आलीय. या टोळीचा मुख्य आरोपी अनिलकुमार जैन असून, त्यांनी आतापर्यंत कोट्यवधीच्या नोटा बदलवून दिल्याची माहिती आहे. एका शेंगदाण्या मजुराला हाताशी धरून आरोपी रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झालं.

आरोपी अनिलकुमार जैन उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधून २ हजारांच्या चलनी नोटा आणायचा. नंदलाल मोर्या बदलून द्यायचा. नंदलाल मोर्या याचं संविधान स्वायर परिसरात शेंगदाणे आणि स्नॅक्सचं दुकान आहे. याच भागात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कार्यालय आणि विधीमंडळ आहे. तो गरीब मजुरांना २ हजार रूपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी रोजंदारी द्यायचा. ३०० ते ४०० रूपये देऊन नोटा बदलून घ्यायचा. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केलं असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT