nagpur , police  saam tv
महाराष्ट्र

व्यापा-यांसह दहा अटकेत; जुगाराच्या साहित्यासह १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूरातील एका हाॅटेलात पाेलिसांनी टाकली धाड

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या (nagpur) कोराडी राेड परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगारा दरम्यान पाेलिसांनी (police) धाड टाकत दहा जणांना अटक (arrest) केली. यामध्ये काही व्यापा-यांवर देखील कारवाई झाल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. (nagpur latest marathi news)

कोराडी रोडवर एका हॉटेल मालकाने हॉटेलमधील एका रूममध्ये पत्त्यांवर खेळला जाणारा जुगार भरवला आहे. तेथे मोठ्या प्रमाणात पैसे लावले जात असल्याची माहिती खब-याकडून गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली.

त्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी संबंधित हाॅटेलवर धाड टाकली. त्यावेळी घटनास्थळी माेठ्या रक्कमेसह दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पाेलीसांनी ताब्यात घेतलेल्यांची वाहनं आणि इतर साहित्य असे सुमारे 19 लाख रुपयांचा मुद्धेमाल जप्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मुकुंद साळुंखे (पीआय गुन्हे शाखा) यांनी दिली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर अशा प्रकारे लपून छपून जुगार खेळणाऱ्यांमध्ये चांगलीच तंतरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता काळा धंदा! आत गेल्यावर अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT