nagpur crime news  saam tv
महाराष्ट्र

पोलीस असल्याचे सांगून व्यापाऱ्याला सांगलीला नेले, अन्...; नागपूरमधील धक्कादायक घटना

'आम्ही गुन्हे शाखेचे पोलीस आहोत' असं सांगत नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमधून एका व्यापाऱ्याचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : 'आम्ही गुन्हे शाखेचे पोलीस आहोत' असं सांगत नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमधून एका व्यापाऱ्याचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्यापाऱ्याला अपहरण (Kidnapping) करून त्याला सांगलीला घेऊन गेले. सांगलीला पोहोचताच व्यापाऱ्याच्या पत्नीकडे पैसे मागितले आहे. मात्र, या घटनेनंतर पोलिसांनी सूत्र फिरवत आपलं पथक रवाना करत अपहरकर्त्यांच्या सांगलीतून मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये अन्नधान्याचे व्यापारी भूषण तन्ना आपल्या पत्नीसह आले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ दोन इसम आले. त्यांनी आम्ही गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगितलं आणि चौकशीसाठी म्हणून त्या व्यापाऱ्याला घेऊन गेले. बराच वेळ झाला व्यापारी पती आला नसल्याने पत्नीने सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. मात्र, काही वेळातच व्यापाऱ्याच्या पत्नीला अपहरण करणाऱ्यांचा फोन आला. त्यामुळे व्यापाऱ्याच्या अपहरण झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर पत्नीने पोलीस स्टेशन गाठले.

'तुझ्या पतीकडे आमचे ३९ लाख रुपये आहे ते सांगलीला आणून दे आणि पतीला घेऊन जा' घाबरलेल्या पत्नीने तक्रार देताच पोलिसांनी प्रकरण गंभीरपणे घेत सांगलीकडे पथक रवाना केले. सांगलीच्या स्थानिक पोलिसांची सुद्धा मदत घेत पोलिसांनी त्यांना सगळी माहिती दिली. नागपूरचे पथक त्या ठिकाणी पोहोचतात दोन्ही अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता काहीतरी जुन्या पैशाच्या वादातून हे अपहरण झालं असल्याचं पुढे येत आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

SCROLL FOR NEXT