Nagpur: ओमायक्रोनच्या धास्तीने नागरिकांचा लसीकरणावर भर
Nagpur: ओमायक्रोनच्या धास्तीने नागरिकांचा लसीकरणावर भर Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur: ओमायक्रोनच्या धास्तीने नागरिकांचा लसीकरणावर भर

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : सध्या ओमायक्रोन व्हेरिएंटची जगभर दहशत आहे. भारतातही आता या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागपूरकरांनीही ओमायक्रोनची चांगलीच धास्ती घेतली आहे. त्यामुळे नागरिक लसीकरणावर भर देत आहेत. नागपूरात आतापर्यंत रेकॉर्डब्रेक झाले आहे. एकाच दिवशी 70 हजारांवर नागरिकांनी लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत 5 लाखांवर नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

हे देखील पहा-

ओमायक्रोन व्हेरिएंटशी मुकाबला करायचा असेल, तर लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांना लसीकरणाचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक लसीकरण करण्यावर भर देत आहेत. त्यामुळेच नागपूरात लसीकरणाचा वेग अचानक वाढला आहे. नागपूर शहरात पहिला डोज घेणाऱ्यांची टक्केवारी 97.12 वर गेली आहे. तर २ डोज घेणाऱ्यांचे प्रमाण 58.97 टक्क्यांवर गेले आहे.

अजूनही दुसरा डोज घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र, ओमायक्रोनच्या धास्तीने हे प्रमाण वाढत आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर 24 देशामध्ये करोनाचा नवा व्हेरीयंट ओमायक्रोन पोहोचला आहे. दरम्यान अमेरिकेत ओमायक्रोनचा शिरकाव झाला असून या व्हेरीयंटचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण अमेरिकेमध्ये सापडला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

Raveena Tandon: रविनाचा हवाहवाई लूक; पाहा फोटो..

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

Ruchira Jadhav: अवतरली सुंदरी... रुचिराचा मनमोहक साडी लूक!

SCROLL FOR NEXT