Nagpur : कुख्यात गुंड शोएब सलीम खानकडून कारागृह अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला! SaamTvNews
महाराष्ट्र

Nagpur : कुख्यात गुंड शोएब सलीम खानकडून कारागृह अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला!

कुख्यात राजा गौस टोळीचा सदस्य असलेला गुंड शोएब सलीम खान याने कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर कारागृहातच प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मंगेश मोहिते

नागपूर : कुख्यात राजा गौस टोळीचा सदस्य असलेला गुंड शोएब सलीम खान याने कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर कारागृहातच प्राणघातक हल्ला (Attack) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अचानक झालेल्या हल्यात हेमंत इंगोले जखमी झाले आहे. कारागृहातील कर्मचारी आणि अन्य कैद्यांच्या मदतीने शोएब सलीम खानला आवरण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याची धुलाई करण्यात आल्याने तो थेट रुग्णालयात पोहचला आहे. हेमंत इंगोले यांच्या तक्रारीकरून धंतोली पोलीस ठाण्यात शोएब सलीम खान विरुद्ध गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

सात वर्षांपूर्वी राजा गौस आणि त्याच्या चार साथीदारांनी नागपूर (Nagpur) मध्यवर्ती कारागृहाची अभेद्य सुरक्षा व्यवस्था भेदून पळ काढला होता. गुंड शोएब सलीम खान 2013 पासून मोक्का कायद्याच्या अंतर्गत कारागृहात कैद आहे. त्याने 2015 साली राजा गौसच्या मदतीने जेल मधून धूम ठोकली होती. त्याला अटक झाल्यानंतर त्याला स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले होते.

त्याचा राग मनात धरून शोएब सलीम खानने तुरुंग अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर हल्ला केला असल्याचं निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी शोएब सलीम खानच्या बॅरेकची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात धारधार तार आणि काही आक्षेपार्ह साहित्य मिळून आले होते, त्यामुळे तो पुन्हा काही तरी मोठं करण्याच्या तयारी होता या शंकेला वाव असल्याने जेल अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी केली होती. त्या रागातून शोएब सलीम खानने हेमंत इंगोले यांच्यावर हल्ला केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली रेल्वे स्थानकातून राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना

मोदी सरकारचं गिफ्ट! ५ टक्के व्याजावर ३ लाखांचं कर्ज; काय आहे सरकारची योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT