Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

Nagpur News : शनिवारी दुपारी ज्ञानेश्वरी तिच्या पतीसोबत कारमधून तिच्या मूळ गावी काचूरवाहीकडे निघाले होते. तर वाटेत नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कन्हान नदीच्या नेरी पुलावर पोहोचले

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: नागपूरहून निघालेले पती- पत्नी नागपूर जिल्ह्याच्या नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी पुलाजवळ थांबले. नदी आल्याने गाडी थांबवून दोघेही निर्माल्य कान्हन नदीत टाकण्यासाठी पुलावर थांबले. यानंतर दोघांची सेल्फी काढण्यासाठी पतीने मोबाईल काढला. पतीने सेल्फी काढत असतानाच अचानक पत्नीने पुलावरून नदीत उडी मारली. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना रक्कम शनिवारी घडली आहे.

नागपूरच्या रामटेक तालुक्याच्या काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या सध्या नागपूरच्या मानेवाडा संकुलात पती विजय साकोरे सोबत राहत होते. दरम्यान शनिवारी दुपारी ज्ञानेश्वरी तिच्या पतीसोबत कारमधून तिच्या मूळ गावी काचूरवाहीकडे निघाले होते. तर वाटेत नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कन्हान नदीच्या नेरी पुलावर पोहोचले. 

सेल्फी काढताच घेतली नदीत उडी 

यानंतर दोघांनीही गाडी थांबवली आणि दोघांनीही सोबत सेल्फी फोटो घेतली. त्यानंतर निर्माल्य नदीत फेकू लागले. याचवेळी अचानक ज्ञानेश्वरीने पुलावरून नदीत उडी मारली. हे पाहून तिच्या पतीचे भान सुटले आणि तो ओरडू लागला. मात्र नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने काही कळण्याच्या आत पत्नी प्रवाहात वाहून गेला. दरम्यान, कामठीच्या नवीन कामठी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. 

दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक गोताखोरांच्या मदतीने महिलेचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्या दिवशी रविवारी ज्ञानेश्वरीचा मृतदेह पोलिसांना सापडला. कौटुंबिक कलहामुळे महिलेने असे आत्महत्येचे पाऊल उचलले असेल; असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT