Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Police Bharati : हा कॉपीबहाद्दर 'मुन्नाभाई MBBS' च्याही पुढचा निघाला; कारागृह पोलीस भरती परीक्षेत भलतीच 'बनवाबनवी'

Nagpur News : नागपूरच्या कारागृह पोलीस शिपाईसाठी २९ सप्टेंबरला मानकापूर क्रीडा संकुलात लेखी चाचणी परीक्षा घेण्यात आली. दुपारी तीन वाजताच्या सुमारास परीक्षेला सुरुवात झाली

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : नागपूरच्या कारागृह पोलीस भरतीसाठी परीक्षा झाली. या परीक्षेत स्पाय माईकचा वापर करून कॉपी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात परीक्षा केंद्रावर स्पाय माईकचा वापर करणारा परीक्षार्थी व त्याला मदत करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. 

नागपूरच्या (Nagpur News) कारागृह पोलीस शिपाईसाठी २९ सप्टेंबरला मानकापूर क्रीडा संकुलात लेखी चाचणी परीक्षा घेण्यात आली. दुपारी तीन वाजताच्या सुमारास परीक्षेला सुरुवात झाली असता यात एक परीक्षार्थी संशयास्पद हालचाली करत पुटपुटत असल्याचे दिसून आले. यावरून त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्या कानात एक स्पाय माईक दिसून आला. तसेच अंगझडती घेतली असता एक मोबाईल आणि एक ब्लुटूथ डिव्हाईस देखील मिळून आले आहे.

एकाला घेतले ताब्यात 

किसन जोनवाल असे स्पाय माईकचा वापर करणाऱ्या परीक्षार्थीचे नाव आहे. तर जिवन काकरवाल असे त्याला मदत करणाऱ्याचे नाव आहे. (Police) पोलिसांनी दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला असून किसन जोनवाल याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदाराचा शोध सुरू आहे पुढील तपास सुरू आहे. मात्र जीवन हा पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच यामध्ये आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अमित शाह कधीही पंतप्रधान होणार नाही: Sanjay Raut यांचा मोठा दावा

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका, अचानक व्हिसा अपॉइंटमेंट बुकिंग थांबवली; कारण आलं समोर

Warm milk before bed: रात्री फक्त दुधात मिसळून प्या हे 3 पदार्थ, शांत झोप लागण्यास मिळेल मदत

मध्य रेल्वेवर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा ब्लॉक, अनेक लोकल अन् एक्सप्रेसच्या वेळेत बदल, पाहा A टू Z माहिती

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बेत बिघडली, खासदार संजय राऊतांचा दावा, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT