Nagpur  Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : धक्कादायक.. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ आढळली तीन महिन्यांच्या चिमुकली

Nagpur News : नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पवनसुत नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : नागपूरमध्ये एक तीन महिन्याची चिमुकली कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ बेवारसपणे पडलेली आढळून आली आहे. कचरा वेचणाऱ्या महिलांना हि चिमुकली आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

नागपूर (Nagpur) शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पवनसुत नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या परिसरात असलेल्या मोकड्या जागेवर कचरा टाकण्यात येत असतो. याठिकाणी प्लास्टिक गोळा करण्यासाठी महिला जात असतात. त्यानुसार परिसरात दुपारच्या सुमारास कचरा वेचायला गेलेल्या महिलेला लहान मुलं रडत असल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने महिला गेली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिलेने पोलिसात हा प्रकार सांगितलं.  

सदर चिमुकली साधारण तीन महिन्याची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर तिच्या अंगावर काही जखमा असून चिखल लागलेल्या अवस्थेत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ चिमुकली आढळली. चिमुकलीवर सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून पोलीस चिमुकलीच्या पालकांचा शोध घेत आहेत. दरम्यान अनैतिक संबंधातून किंवा पारिवारिक वादातून मुलीला सोडल्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muhurut Trading 2025 : शुभ मुहूर्तावर सेन्सेक्स-निफ्टीची सौम्य तेजी; कोणते शेअर्स चमकले?

Mumbai Crime News : मीरारोडमध्ये मोठा राडा! मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी; २० रिक्षांची तोडफोड

Kapoor Family: फॅम जॅम...! बॉलिवूडच्या कपूर खानादानाचा रॉयल दिवाळी फेस्ट लूक

Relationship Tips: सणासुदीला नवरा-बायकोमध्ये भांडणं का होतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Maharashtra Politics: ऐनदिवाळीत राजकीय वादाचा धमाका! माजी आमदारांच्या प्रवेशांवरून भाजपात फुटला वादाचा बॉम्ब; निष्ठावंतांची नाराजी

SCROLL FOR NEXT