Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : दुकान चालवण्यासाठी मागितली खंडणी; तिघांना बर्डी पोलिसांकडून अटक

Nagpur News : स्टेशन परिसरात दुकान लावणाऱ्या दुकानदारांस दुकान चालवण्यासाठी खंडणी मागण्यात आली

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : उदरनिर्वाहासाठी रेल्वे स्टेशन परिसरात काही जण दुकान लावत असतात. मात्र दुकान लावण्यासाठी काहीजण पैसे घेत असतात. असाच प्रकार नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात समोर आला असून; दुकानदाराकडून खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नागपूर (Nagpur) रेल्वे स्टेशन परिसरात नेहमीप्रमाणे दुकान लावले जात होते. मात्र स्टेशन परिसरात दुकान लावणाऱ्या दुकानदारांस दुकान चालवण्यासाठी खंडणी मागण्यात आली, त्याने पैसे देण्यास विरोध केल्याने दुकानातील साहित्य फेकून देत दुकानदारास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या (Railway Station) प्रकरणी खंडणी मागणी व मारहाण केल्याप्रकरणी दुकानदाराने बर्डी पोलिसात अज्ञात गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी (Police) सदर प्रकरणाचा तपास करत तिघांना अटक करण्यात आली. या तिघांपैकी दोन जण हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. यात चेतन गोखले, सोमनाथ उर्फ बाळू जाधव असे नाव असून बाळूला तडीपारीची कारवाई सुद्धा करण्यात आली होती. या प्रकरणी पुढील तपास बर्डी पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NDA प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठी? अमित शाहांनंतर सुनील तटकरे मोदींना भेटले

Accident: सोलापूर-धुळे महामार्गावर साईभक्तांच्या वाहनाचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू,२० जण जखमी

पार्थ पवार- कायनात दारा यांच्या साखरपुड्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती; पाहा खास Photos

Rahul Gandhi: 'पॅलेटगन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच'; राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान

PMC News: विकासकामांच्या पैशांवर नगरसेवकांचा डल्ला? पुणे महापालिकेतील टक्केवारीचं रेटकार्ड उघड

SCROLL FOR NEXT