Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : कुटूंब प्रयागराज कुंभमेळ्यासाठी बाहेर पडताच चोरट्याने साधली संधी; ५ लाखांचा मुद्देमाल लांबविला

Nagpur News : नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीच्या प्रमाण वाढले आहे. शहरात मागील दिवसात दोन ते तीन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. बंद घरांना टार्गेट करत चोरटे ऐवज लांबवत असल्याचे निदर्शनास आले

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे कुंभस्नानासाठी कुटुंब गेल्याची संधी साधत चोरट्याने घरात प्रवेश करत चोरी केली. चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला आला. घरात प्रवेश करतानाच्या चोरट्यांचा हालचाली घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत.

नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीच्या प्रमाण वाढले आहे. शहरात मागील काही दिवसात दोन ते तीन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. बंद घरांना टार्गेट करत चोरटे घरातून ऐवज लांबवत असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान नागपूर शहरात मागील काही दिवसात वाढत्या घटना रोखण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. यातच आणखी एक चोरीची घटना घडली असून यात जवळपास पाच लाखाचा ऐवज लांबविला आहे. 

पांडे कुटुंब कुंभमेळ्यात 

नागपुरातील राकेश पांडे यांच्या घरात चोरीची घटना घडली आहे. दरम्यान राकेश पांडे हे सहकुटुंब प्रयागराज येथे कुंभमेळ्यात घराला कुलूप लावून गेले आहेत. घरी कोणी नसल्याच्या संधीचा फायदा उचलत अज्ञात चोरांनी त्यांच्या घरातील खिडकीतून प्रवेश केला. यानंतर आलमारीतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा चार लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. दरम्यान पांडे कुटुंब घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. 

चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

घरात चोरी झाल्यानंतर पांडे कुटुंबाने पोलिसांना माहिती दिली. दरम्यान चोरी करण्यासाठी घरात प्रवेश करताना चोरटा घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. पोलिसांकडून त्याचा तपास तांत्रिक पद्धतीने आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी सुरू केला आहे. अज्ञात चोरटा हा सर्राइत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP आमदाराच्या नावाचं बनावट लेटरहेड; मंजूर कामाऐवजी काढला नव्या कामांचा GR, शिंदे सेनेच्या माजी आमदाराचा कारनामा

शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण आणि महाआरती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

Healthy Diet : कडधान्य की पालेभाज्या? पावसाळ्यात शरीरासाठी काय योग्य, वाचा

SCROLL FOR NEXT