Nagpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! भूतबाधा घालवण्यासाठी आई - वडिलांकडून मारहाण, ६ वर्षीय मुलीचा मृत्यू

धक्कादायक! भूतबाधा घालवण्यासाठी आई - वडिलांकडून मारहाण, ६ वर्षीय मुलीचा मृत्यू

मंगेश मोहिते

नागपूर : गेल्‍या काही दिवसांपासून मुलगी सतत आजारी राहणे आणि तिचे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबाधा झाल्याची शंका होती. मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेतून मुलीची यातून मुक्तता करण्याच्या नावाखाली आई-वडिलांनी तिला जबर (Crime) मारहाण केली. त्यात सहा वर्षीय मुलीचा मृत्यू (Death) झाल्‍याची धक्‍कादायक घटना घडली. (Nagpur Crime News)

नागपूरच्या (Nagpur) सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या दाम्‍पत्‍य सहा वर्षीय मुलीसह वास्‍तव्‍यास आहे. आपली मुलगी गेल्‍या काही दिवसांपासून आजारी असल्‍याने तिला भूतबाधा झाल्‍याची शंका आई– वडीलांना होती. या दरम्‍यान त्‍यांनी एका भोंदू बाबाकडे नेले असता या बाबाच्या सल्ल्याने त्यांनी तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते. मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता.

मुलीला रात्री तिघांकडून मारहाण

शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री सदर दांपत्य आणि त्यांच्या एका महिला नातेवाईकाने घरातच भूत बाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली सहा वर्षीय मुलीला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. ती चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली. घाबरलेल्या आई-वडिलांनी लगेच तिला घेऊन रुग्णालयाकडे (Hospital) धाव घेतली. मात्र उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता.

मुलीचा मृतदेह जिल्‍हा रूग्णालयात टाकून काढला पळ

आरोपी आई- वडील एवढ्यावरच थांबले नाही. तर त्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने मुलीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तेथून पळ काढला. मात्र, रुग्णालयाच्या आवारात एका लहान मुलीचा मृतदेह बेवारस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत मृतदेह या ठिकाणी कोणी आणून ठेवला याची माहिती मिळवली. मृतदेह कोणत्या गाडीतून त्या ठिकाणी आणण्यात आला. त्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा शोध लावला आहे. याप्रकरणी आरोपी आई– वडील व मुलीची मावशी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

Monsoon Hair Care: पावसाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? पावसाळ्यात हीच चूक ठरू शकते केस गळतीचं कारण

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

SCROLL FOR NEXT