Nagpur Crime Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : उपचारासाठी दाखल कैदी रुग्णालयातून फरार; पोलिसांकडून शोध सुरु

nagpur News : नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला हर्ष रामटेक असे पळालेल्या कैद्यांचे नाव आहे. हर्ष रामटेक याला नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : चोरीच्या गुन्ह्यात नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्याना शासकीय मेडिकल रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान दाखल असताना मध्यरात्रीच्या सुमारास या कैद्याने रुग्णालायातून पलायन केल्याची घटना समोर आली आहे. सदरची घटना रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली असून फरार झालेल्या चोरट्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 

नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला व रुग्णालयातून फरार हर्ष रामटेक असे पळालेल्या कैद्यांचे नाव आहे. हर्ष रामटेके याला नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान त्याला दोन दिवसांपूर्वी चक्कर आणि उलटीचा त्रास होत असल्याने नागपूरचा शासकीय मेडिकल तथा रुग्णलायत दाखल करण्यात आले होते.

पोलीस कर्मचारी असताना फरार होण्यात यशस्वी 
दोन दिवसांपासून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. या दरम्यान पोलीस मुख्यालयाचा पोलीस कर्मचाऱ्यांच्या निगराणीखाली हा आरोपी रुग्णालयात दाखल होता. मात्र मध्यरात्री संधीचा फायदा घेत तो पसार झाला आहे. त्याच्या हाताला लाल रंगाचा कापड बांधून कुटुंबाचा नातेवाईक असल्याचे भासवत तो पसार होण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
कैदी हर्ष रामटेके हा फरार झाला यावेळी रुग्णलयाचा सुरक्षा रक्षाक बेंचवर बसलेला होता. तरी देखील तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान कैदी फरार होत असताना रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणात अजनी पोलीस ठाण्यात उपचारादरम्यान फरार कायद्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फरार कैद्याचा तपास पोलीस करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : अमोल कोल्हे

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

SCROLL FOR NEXT