Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur Flyovers : नागपूरातील १४ उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद; नायलॅान मांजामुळे अपघात टाळण्यासाठी निर्णय

Nagpur News : मांजाचा वापर व विक्री होत आहे. आज देखील नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा गळा कापला गेल्याची घटना घडली सुरक्षा म्हणून नागपूरमधील १४ उड्डाणपुलावरील वाहतुकीस बंदी

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: मकरसंक्रांतीचा सण आज सर्वत्र साजरा होत असताना ठिकठिकाणी पतंगोत्सव देखील साजरा केला जात आहे. या पतंगोत्सवात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात असलेले १४ उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या पुलावरून होणारी वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली आहे. 

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सव साजरा केला जात आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना दरवर्षी होत असतात. यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील या मांजाचा वापर व विक्री होत आहे. दरम्यान आज देखील नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या एक पोलीस कर्मचाऱ्याचा गळा कापला गेल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे सुरक्षा म्हणून नागपूरमधील १४ उड्डाणपुलावरील वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. 

 या उड्डाणपुलावर राहणार बंदी 

नागपूर पोलीस प्रशासन घेतलेल्या निर्णयानुसार शहरातील सदर, बर्डी, रामविलास, सक्करदरा, दिघोरी, गोळीबार पाचपावली, कळंबे चौक ते सदर, दहीबाजार, मेहंदीबाग यासह १४ उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. बंद केलेल्या प्रत्येक उड्डानपुलाच्या दोन्ही बाजुंनी बॅरिकेटिंग लावण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत उड्डाणपुलावरून वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आल्याचे वाहतूक विभागाच्या साह्यक पोलीस आयुक्त माधुरी बाविस्कर यांनी सांगितलं.

दुचाकींवर बांधल्या तार 

नायलॉन मांजापासून बचावासाठी दुचाकींवर तार बांधण्यात आल्या आहेत. शहरातील स्वयंसेवी संघटना आणि नागपूर वाहतूक पोलिसांकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अचानक समोर येणाऱ्या मांज्यापासून बचावासाठी दुचाकी सामोर हँडलवर यु आकाराचा तार बांधून बचाव केला जाऊ शकतो. या तारामुळे मांजा गळ्याला न लागता ताराला अडकून खाली पडून जातो. त्यामुळे दुखापत होण्याचा धोका टळतो. त्यामुळे मांजापासून बचावासाठी दुचाकीस्वारांनी गळ्याभोवती दुपट्टा गुंडाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णणावर नागरिक संतप्त, शिंदेसेनेचा आंदोलनाचा इशारा

Methi Ladoo Recipe: कडवटपणा निघून जाईल! मेथीच्या लाडूची ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील लहान मुलेही मागून खातील

Private railway station: ना टॅक्सी...ना कार..नवाबासाठी ट्रेन थेट राजवाड्यात यायची! या रेल्वे स्टेशनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Pune : पुण्यातील कृषी महाविद्यलयातील डॉ. महानंद माने यांची बदली, कुठे झाली नियुक्ती?

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

SCROLL FOR NEXT