Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur: १००० किलोहून अधिक गांजा जप्त; सेंद्रीय खतांच्‍या ट्रकमधून वाहतूक

१००० किलोहून अधिक गांजा जप्त; सेंद्रीय खतांच्‍या ट्रकमधून वाहतूक

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या सीमेवर सेंद्रिय खतांनी भरलेल्या एका ट्रकमधून 1000 किलो पेक्षा जास्त गांजा जप्त केला आहे. नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) अमली पदार्थ विरोधी पथकाने आज पहाटे नागपूरच्या (Nagpur) कापसी परिसरात ही कारवाई केली आहे. (Live Marathi News)

ओडिशामधून (Odisa) सेंद्रिय खत घेऊन निघालेल्या ट्रकमध्ये सेंद्रिय खताच्या शेकडो पोत्यांमध्ये गांजाचे जवळपास 50 पोते लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांना (Police) या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष प्रशिक्षित केनाईन डॉगच्या मदतीने या ट्रकची तपासणी केली. त्यामध्ये एक हजार किलो पेक्षा जास्त गांजा सापडला आहे.

बीडमधून दोघे ताब्‍यात

याप्रकरणी नागपूर पोलिसांच्या माहितीवर बीडमध्येही दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रकमध्ये लादलेले सेंद्रिय खत शिर्डीला पाठवण्यात येत होते. त्यामुळे शिर्डीमध्येही यासंदर्भात पोलीस तपास करणार आहे. दरम्यान संपूर्ण 1000 किलो गांजा निश्चितच बीडमध्ये वापरला जाणार नव्हता. तर तो तिथून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवला जाणार होता का? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT