Nagpur Fire  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: हिंगणा MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Latest News: अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Priya More

Nagpur: नागपूरमध्ये अ‍ॅग्रो कंपनीला भीषण आग (Nagpur Company Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. हिंगणा एमआयडीसीमध्ये (Hingana MIDC) ही घटना घडली आहे. या आगीमध्ये 4 कामागरांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीत ही घटना घडली आहे. कटारिया अ‍ॅग्रो प्रा. लि. या कंपनीला सोमवारी अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीत काम करणाऱ्या 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर 3 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कामगारांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कंपनीला लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या ही आग नियंत्रणात आली आहे. कंपनीला लागलेली ही आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट आसपासच्या परिसरामध्ये पसरले आहेत. आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. इलेक्ट्रिक पॅनलमध्ये स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीमध्ये मोठ्याप्रमाणात भूसा असल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते.

कटारिया अ‍ॅग्रो कंपनीला लागलेल्या आगीमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. फडणवीसांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्‍यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या तीन कामगारांना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT