Journalist Arun Phanshikar Suspicious Death SAAM TV
महाराष्ट्र

Nagpur News: ज्येष्ठ पत्रकार अरूण फणशीकर यांचा मृत्यू, विहिरीत पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Journalist Arun Phanshikar Suspicious Death: पोटाला दगड बांधला असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Veteran Journalist Arun Phanshikar death : नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार अरूण फणशीकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांच्या घराजवळील विहिरीत पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोटाला दगड बांधला असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अरुण फणशीकर नागपूरमधील 70, आदित्य अपार्टमेंट, गिरीपेठ येथे राहात होते. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे घराबाहेर फिरायला गेले होते. परंतु बराच वेळा उलटूनही ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी पोलिसांकडे ते बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.

दरम्यान फणशीकर यांच्या घराजवळी विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणचे त्यांच्या कमरेला दगड बांधलेला होता. त्यामुळे त्यांच्यासोबत घातपात झालाची शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. फणशीकर यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याचा तपास पोलीस करीत आहेत. (Breaking News)

अरूण फणशीकर नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी हितवाद, इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्थान टाइम्स अशा वर्तमानपत्रात काम केले आहे. त्यांनी पत्रकारितेची सुरुवात नागपूरमध्ये एका दैनिकातून केली होती. हितवाद या वृत्तपत्रात काम केल्यानंतर ते इंडियन एक्सप्रेसच्या नागपूर आवृत्तीत मुख्य वार्ताहर म्हणून रुजू झाले. त्यांनी जनसंवाद विभागातही अनेक वर्षे अध्यापनाचं काम केलं. त्यांच्या आकस्मिक निधनाने नागपूरच्या वृत्तपत्रसृष्टीला धक्काबसला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Genelia Deshmukh Photos: साडी आणि मराठमोळे दागिने, देशमुखांच्या सुनेचा 'राजेशाही' थाट! Photo पाहतच राहाल

KDMC: शिक्षण साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई ; केडीएमसी शिक्षण विभाग अॅक्शन मोडवर

Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

SCROLL FOR NEXT