Couple Viral Video Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News: नागपुरात चाललंय काय? तरुणी नशेत धुंद, तरुण आला अन् उचलून घेऊन गेला; धक्कादायक VIDEO

Couple Viral Video After Fall In Road: नागपूरमधून एका जोडप्याचा व्हायरल व्हिडिओ समोर आलाय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, तरूणी स्वत:ला सांभाळू शकत नसल्याने तरूण तिला उचलतो, अन स्वत:ही पडतो.

Rohini Gudaghe

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूरमध्ये सध्या काय चाललंय? असा सवाल आता निर्माण होत आहे. मागील काही दिवसांपासून जोडप्यांचे भररस्त्यात वाहनांवर अश्लील चाळे सुरू असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एक विचित्र आणि धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. एक तरुणी स्वतःला सांभाळू शकत नसताना तरुण तिला सांभाळतो आणि घेऊन जाताना पडतो, असा हा व्हायरल व्हिडीओ नागपुरमधून सामोर येत आहे.

तरूणीला सांभाळायला गेला...,

गेल्या काही दिवसांपासून नागपूरमधून एकामागून एक धक्कादाय व्हिडिओ समोर येत (Nagpur News) आहे. हा व्हिडीओ नागपुरातील बजाज नगर पोलीस स्टेशनला हद्दीतील असल्याचं सांगितलं जात आहे. तरुणी ही कुठल्या तरी नशेत असल्याचा कयास लावला जात आहे. तरूण तरुणीला सांभाळताना दिसत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.

व्हायरल व्हिडिओनंतर खळबळ

व्हिडिओमध्ये दिसतंय की, तरुणीला चालता येत नसल्याने तो तरूण तिला उचलत नेत (Viral Video) आहे. थोडं अंतर चालल्यानंतर पाय अडकून दोघेही खाली पडतात.हा व्हिडिओ नेमकं केव्हाचा आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही, तरी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. बजाज नगर पोलिसांनी या संदर्भात एका खाजगी कॉलेजला विचारणा केली आहे. परंतु याबद्दल अजून कुठलीही माहिती उपलब्ध झाली नसल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

नागपूरमध्ये चाललंय काय?

गेल्या आठवड्याभरात प्रेमी युगलांचे अश्लील चाळे करणारे कार आणि दुचाकीवरील व्हिडिओ समोर आले (Couple Viral Video) होते. या सर्व घटनांमुळे नागपूरमध्ये चाललंय काय? असा सवाल आता विचारला जात आहे. मागील आठवड्यामध्ये एका कुख्यात गुंडाने दुचाकीवर प्रेयसीसोबत भररस्त्यात रोमान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला (Intoxicating) होता, तर त्यापूर्वी भरधाव कारमध्ये स्टीअरिंगवर बसून तरूणीने प्रियकरासोबत अश्लील चाळे केल्याची घटना देखील समोर आली होती. या सर्व घटनांमुळे शहराच्या संस्कृतीला गालबोट तर लागत नाही ना, असा प्रश्न देखील निर्माण होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT