Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News: हमाली काम करणाऱ्याकडे आढळला देशी कट्ट्यासह काडतूस

हमाली काम करणाऱ्याकडे आढळला देशी कट्ट्यासह काडतूस

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरच्या कळमना मार्केट परिसरात एकाकडून देशी कट्ट्यासह सात जिवंत काडतूस (Nagpur News) जप्त करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना (Police) यश आले आहे. हा व्यक्ती मार्केटमध्ये हमाली करण्याचे काम करतो. मात्र याच्याकडे देसी कट्टा कुठून आला याचा शोध पोलीस घेत आहे. (Tajya Batmya)

नागपूरच्‍या कळमना मार्केटमध्ये हमालीचे काम करणारा झलेंद्र लोधी नावाच्या इसमाकडे एक देशी कट्टा असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार त्यांनी त्या व्यक्तीला गाठत त्याची चौकशी केली असता त्याने आपल्याकडे देशी कट्टा असल्याचे कबूल केले. त्यावरून पोलिसांनी (Police) त्याच्या घराची झडती घेतली असता देसी कट्टासह सात जिवंत काडतुस सुद्धा त्याच्या घरी मिळून आले.

पोलिसांकडून शोध सुरू

मात्र हे कुठून आले अशी विचारणा केली असता आग्राच्या एका व्यापाऱ्याने आपल्याला ठेवायला दिले असल्याचे सांगितले. सध्या तरी त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल नसले तरी पोलीस हा कट्टा याच्याकडे कसा आला आणि खरंच कोणी ठेवायला दिला का याचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरात पुन्हा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...

उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला; 45 लाखांची लाच घेताना बड्या सरकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडला

Health Tips : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? ९९% लोकांना माहितीच नाहीत

Toothache Remedies : तुमची दाढ सुन्न पडते? आजीच्या बटव्यातील 'हे' रामबाण उपाय घरच्याघरी करा

Health Care : रात्री सतत लघवीला होते? 'या' आजाराची असू शकतात लक्षणं

SCROLL FOR NEXT