Nagpur Nursing Student Dies Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Nursing Student Dies: पाणीपुरी खाल्ल्याने BSC नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू? नागपुरातील खळबळजनक घटना

Nagpur Nursing Student Dies Due To Eating Panipuri: शितल ही मूळची जम्मू-काश्मीरमधील असून ती नागपूर येथे BSC नर्सिंग काँलेजची विद्यार्थिनी होती.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Nursing Student Dies: नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुग्णसेवेत करिअर करण्याचं स्वप्न पाहत असलेल्या एका १८ वर्षीय तरुणीचा बुधवारी रात्री अचानक मृत्यू झाला. या विद्यार्थीनीने पाणीपुरी (Pani Puri) खाल्ली होती. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

शीतल कुमार (वय १८) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. शितल ही मूळची जम्मू-काश्मीरमधील असून ती नागपूर (Nagpur News) येथे BSC नर्सिंग काँलेजची विद्यार्थिनी होती. प्राप्त माहितीनुसार, शीतलने ३ जुलै रोजी संध्याकाळी बाहेर जाऊन पाणीपुरी खाल्ली.

मेडिकल कॉलेजमधील (Medical College) वसतिगृहात परतल्यावर तिने पोट भरले असल्याचे सांगत जेवण टाळले. त्यानंतर रात्री तिला उलट्या आणि हगवणीचा त्रास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी त्रास कमी होत नसल्याने तिने मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागातून औषधोपचार घेतला.

परंतु रात्रीपर्यंत तिला आराम पडला नाही. डॉक्टरांच्या सूचनेनंतरही ती रुग्णालयात दाखल व्हायला तयार नव्हती. दरम्यान, जुलाब लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आली. त्यानंतर तिची प्रकृती आणखीच खालवली.

दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री शीतलचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तिला पाणीपुरीतून विषबाधा झाली की काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT