Nagpur Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Young Boy Drowned In Nagpur: फिरायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला! नाव उलटल्याने दोघांचा तलावात बुडून मृत्यू

Nagpur Crime News: नाव अर्धवट तुटलेल्या अवस्थेत होती. यामुळेच नौकानयन करत असताना अचानक ही लाकडी नाव उलटली.

मंगेश मोहिते

Nagpur News: नागपूरच्या पारशिवनी तलावात (Parshivani Dam) दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. हे दोन्हीही तरुण नागपूरच्या पारशिवनी येथील तलावात फिरायला गेले होते. यावेळी नौका नयन करताना ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरच्या महेश कॉलनी परिसरातील भवानी जांगिड (वय 24) आणि पंकज जांगिड (वय 23) हे दोन्ही तरुण पाराशिवनी येथील बरेजा पंच कमिटीच्या तलावात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी ते दोघेही लाकडी नावेत बसून नौकानयन करु लागले. मात्र ती नाव अर्धवट तुटलेल्या अवस्थेत होती. यामुळेच नौकानयन करत असताना अचानक ही लाकडी नाव उलटली. ज्यामध्ये दोन्हीही तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरूवार (३०, मार्च) रोजी ही घटना घडली आहे.

फिरायला गेलेल्या दोन तरुणांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेने दोन्हीही तरुणांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलिस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत..(Nagpur News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Maharashtra News Live Update: पावसासाठी शेतकऱ्यांचा अनोखा जुगाड; वरुणराजाला साकडं घालत चक्क गाढवाचं लग्न!

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT