Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur News : नागपूरमध्ये हेराफेरी! इस्रो आणि नासाचं ऑफिस उघडले, १११ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रे दिली, ५ कोटी उकळले!

Nagpur News : ओंकार तलमले, अश्विन वानखडे व चेतन भोसले यांनी कार्यालय उघडून युवकांना इस्रो आणि नासामध्ये नौकरी लावून देण्याचे आमिष दिले.

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 
नागपूर
: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांशी संपर्क साधून त्यांना इस्रो आणि नासामध्ये नौकरी देण्याचा शब्द दिला. इतकेच नाही तर बनावट नियुक्तीपत्र देखील दिले आहे. यासाठी पैसे उकळत फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरात उघडकीस आला आहे. यामध्ये साधारण १०० च्यावर तरुणांना नौकरी देतो म्हणत सुमारे साडे पाच कोटी रुपये घेऊन फसवणूक झाली आहे.

अश्विन वानखडे आणि चेतन भोसले असे (Fraud) फसवणूक करणाऱ्या आरोपींचे नाव आहे. सुरवातीला या दोघांनी तक्रार दिली होती. मात्र तपासात हेच आरोपी असल्याचे समोर आले. यात ओंकार तलमले, अश्विन वानखडे व चेतन भोसले यांनी कार्यालय उघडून युवकांना इस्रो आणि नासामध्ये नौकरी लावून देण्याचे आमिष दिले. १११ तरुणांना फेक नियुक्तीपत्र देण्यात आले. मात्र पैसे देऊन फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर बजाजनगर (Police) पोलिसात २०२३ मध्ये तक्रार दाखल झाली होती. 

दोघांना केली अटक 
पोलिसांनी तपास केला असता ओंकार तलमले हा खुनातील आरोपी असून त्यावेळी अश्विन वानखडे ह्यानेच ओंकार विरोधात तक्रार केली. यानंतर पोलीस तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू असताना अश्विन आणि चेतन या दोघांचाही खात्यात फसवणूक झालेल्या तरुणांनी पैसे जमा केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यामुळे पोलिसांनी त्या दोघांना सहआरोपी करत अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT