नागपूर मेट्रोच्या संचालकांवर मेडीकल बील घोटाळ्याचा आरोप! Saam Tv
महाराष्ट्र

नागपूर मेट्रोच्या संचालकांवर मेडीकल बील घोटाळ्याचा आरोप!

नागपूर मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी वैद्यकीय बिलाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी चे नेते प्रशांत पवार यांनी केला.

संजय डाफ

संजय डाफ

नागपूर : नागपूर मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी वैद्यकीय बिलाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी चे नेते प्रशांत पवार यांनी केला. ब्रिजेश दीक्षित यांनी यांचे एका वर्षाचे बील हे 64 कोटी रुपये एवढे आहे. मात्र, मेट्रोकडून या आरोपांचं खंडन करण्यात आलं आहे. हे बिल केवळ वैद्यकीय खर्चाचे नाही तर एकत्रित सर्व भत्ते समाविष्ट असल्याचं मेट्रो कडून सांगण्यात आले आहे.

हे देखील पहा-

नागपूर मेट्रो चे संचालक ब्रिजेश दीक्षित आणि इतर संचालकांनी वैद्यकीय खर्चाच्या नावावर लाखो रुपये घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी चे नेते प्रशांत पवार यांनी केलाय. ब्रिजेश दीक्षित यांनी एका वर्षात 64 लाख रुपये उचलले. मेट्रोच्या इतर संचालकांचेही वैद्यकीय बिल लाखो रुपये आहेत. त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय खर्च घेतला जात असून यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली आहे.

मेट्रोनं मात्र या आरोपांचं खंडन केल आहे. प्रशांत पवार हे नेहमीच बिनबुडाचे आरोप करतात. त्यांनी सांगितलेली रक्कम ही केवळ वैद्यकीय खर्चाची नाही तर ती सर्व भत्ते मिळून असलेली असल्याची मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी दिली आहे.

या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. चौकशीची मागणी केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT